पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडल्याने खळबळ माजली आहे. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलाचा पहिलाच वर्षश्राद्ध झाल्यानंतर वडिलांनी झालाडा गळफास लावून आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बोपखेल परिसरातील गणेश नगर परिसरामध्ये ही हृदयदावक घटना घडली आहे. बापू श्रीरंग शिंदे (५६) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर विकी बापू शिंदे असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. विकीने गतवर्षी गणेशोत्सवापूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली होती. (Pimpri-Chinchwad latest News Update)
मिळालेल्या माहितीनुसार, बापू शिंदे यांना दारूचे व्यसन होते.त्यामुळे ते घरी जात नव्हते मात्र, मंगळवारी ते आपल्या मुलाच्या वर्ष श्राद्धासाठी घरी आले होते. त्यानंतर शिंदे यांनी घरातून बाहेर पडून मुळा नदीपात्राजवळ असलेल्या एका झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.
बापू शिंदे यांनी स्वतःच्या मुलाच्या विरहात गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. या प्रकरणात भोसरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत, अशी माहिती भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी झोनपीले यांनी दिली आहे.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.