...तर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही; ऊर्जामंत्र्यांनी दिली माहिती

'उर्जामंत्री जे करंट बिल सांगतात ते अठरा महिन्याचे बिल आहे. ते करंट बिल म्हणता व्याजासाकट बिल आहे. शेतकरी ते भरु शकत नाहीत.'
Nitin Raut
Nitin Raut Saam TV
Published On

रश्मी पुराणिक -

मुंबई: सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय (Budget Session 2022) अधिवेशन सुरु आहे. विरोधक विविध प्रश्नांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची तात्काळ वीज कनेक्शन (Electricity Connection) कापन बंद होणार का? असा सवाल ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना विज तोडणीवरुन प्रश्न विचारला.

यावर बोलताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले, उपमुख्यमंत्री वीज कनेक्शन कापल जाणार नाही असं सांगित ते करंट बिल भरल तर कापणार नाही आणि आम्ही कापत नाही. थकबाकी बाबत सबंधितांनी हफ्ते पाडून द्यावे मग आम्ही करंट बिलावर कनेक्शन सुरू ठेवू असं राऊत म्हणाले. तसंच, उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाला जे सांगितल करंट बिल भरल्यावर आम्ही वीज कनेक्शन सुरू ठेवू आम्ही तश्या सूचना दिल्या आहेत. थकबाकीबाबत शेतकऱ्यांनी ते मागितले तर ते देऊ.

करंट बिल व्याजासाकट आहे -

Nitin Raut
वैराग्याच्या काळातही पवार बगल में छुरी घेऊन फिरतायत; पडळकरांची घणाघाती टीका

राऊतांच्या या उत्तरावर फडणवीसांनी (Devendra Fadanvis) प्रश्न उपस्थित केला ते म्हणाले, उर्जामंत्री जे करंट बिल सांगतात ते अठरा महिन्याचे बिल आहे. ते करंट बिल म्हणता व्याजासाकट बिल आहे. शेतकरी ते भरु शकत नाहीत. बिलं पंचवीस पंचवीस हजार बिल आहेत. तुम्ही तीन महिन्याचे बिल घ्या आणि वीज कनेक्शन तोडणे बंद करा असं ते म्हणाले.

करंट बिल अकरा महिन्याचे नाही तीन महिन्याचे -

थकबाकी वेगळी दाखवतो. २०१४-१५ अकरा हजार पाचशे ६२ थकबाकी होती. ही थकबाकी कशी वाढली? असा प्रश्न उपस्थिक करत आम्ही सूट दिली आहे. आपल्या नेत्यांना माहिती आहे असं राऊतांनी सांगितलं. दरम्यान, या देशात लॉकडाऊन (Lockdown) लागला तेंव्हा २४ तास वीज वापरली, आम्ही कुठेही वीज थांबवली नाही, आम्ही लोडशेडींग होऊ दिलं नाही, ज्या चांगल्या गोष्टी घडल्या कोणी बोलत नाही, जे पाप आधी केलं त्याच्याविषयी कोणी बोलत नाही अशी टीका नितीन राऊतांनी भाजपर केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com