वैराग्याच्या काळातही पवार बगल में छुरी घेऊन फिरतायत; पडळकरांची घणाघाती टीका

राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून आजपर्यंत राष्ट्रवादीचा नेता तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती बाजू घेणं खूप सोपं आहे, पण...
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल उस्मानाबादमध्ये आपण म्हातारं झालो असलो तरी अजून थकलेलो नाही, तुमची साथ असेपर्यंत हा गाडा सुरूच राहील असे व्यक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवारांवर टीका केली आहे.

पडळकर म्हणाले की, पवारांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो. कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात आणि दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. काल त्यांना पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न दिल्यामुळे ते हताश होऊन ते बोलले असतील असं पडळकर म्हणाले.

शरद पवारांचा फडणवीसांवर (Devendra Fadanvis) राग यामुळे आहे की, माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की, शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ खोत असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळेच या महाराष्ट्रील प्रस्थापितांचा तीळपापड होत आहे. म्हणूनच फडणवीस यांच्या नजरेत खुपतात असे देखील गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.

थापा मारण बंद करा -

Sharad Pawar
Breaking... राज्यातील निवडणुका सहा महिने पुढे जाणार

राष्ट्रवादीला जनतेनं निवडून दिलं, असं वक्तव्य पवारांना केलं यावरती बोलताना पढकर म्हणाले 'मी माननीय पवारांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात 2019 ला मा. फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 105 आणि शिवसेनेचे 56 असे एकूण 161 आमदार महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात साताऱ्यात भिजूनसुद्धा 54 आमदारच निवडून आले. त्यामुळे जनतेने निवडून दिलं या थापा मारणं बंद करा.

हे देखील पहा -

आपण म्हणता पुन्हा येऊ देणार नाही. पण NCP पक्ष स्थापन झाल्यापासून आजपर्यंत राष्ट्रवादीचा नेता तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती बाजू घेणं खूप सोपं आहे. पण लोकहितासाठी लढणं, झगडणं हे महाकठीण आहे, अशी खोटक टीकाही पडळकरांनी केली. पुढे पडळकर म्हणाले 'आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या तीसवर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असतं.'

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com