Kalyan Dombivli News : ...अन्यथा रिंग रोडला जागा देणार नाही : शेतक-यांचा इशारा

मुख्यमंत्र्यासह महापालिकेला शेतक-यांनी दिले निवेदन
Kalyan Dombivli News
Kalyan Dombivli Newssaam tv
Published On

- अभिजीत देशमुख

Kalyan Dombivli News : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शहरांच्या विकासाच्या दृष्टीने रिंग रूटचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामात बाधित असलेल्या शेतकऱ्यांनी आमचा रिंग रुटला विरोध नाही, मात्र बाधित शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरनानुसार मोबदला द्या अशी मागणी केली आहे. (Maharashtra News)

Kalyan Dombivli News
Wardha News : आरएसएस जिल्हा संघचालक मारहाणप्रकरणी पाच युवक अटकेत, एकाचा शाेध सुरु : एसपी नुरुल हसन

महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासह डोंबिवली ते टिटवाळा प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे. एमएमआरडीएकडून रिंग रोड तयार केला जाणार असून संपूर्ण शहराला वेढणा-या या रस्त्याचे काम चार ते पाच फेजमध्ये पूर्ण केले जाणार आहे.

Kalyan Dombivli News
Nashik Crime News : विधाते गल्लीत गळा चिरुन विवाहितेची हत्या, पतीसह 10 ते 12 जण पाेलिसांच्या ताब्यात

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दुर्गामाता चौक ते टीटवाळा हा २० किमी लांबीचा रस्ता केला जाणार असून दुस-या टप्प्यात १३ किमी लांबीचा दुर्गामाता चौक ते माणकोली पर्यतचा रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्यामुळे शहरांचा विकास होणार आहे. या रस्त्यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी केंद्र शासन व राज्य शासनाच्या धोरणानुसार मोबदला द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यासह महापालिकेकडे केली आहे.

Kalyan Dombivli News
Satara News : दुष्काळी भागातील प्रकल्पास गती देऊ, साता-यात नव्या एमआयडीसीसाठी प्रयत्न सुरु; देवेंद्र फडणवीस (पाहा व्हिडिओ)

या निवेदनात केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार बाधित शेतकऱ्याना बाजार भावाच्या दुप्पट मोबदला रोख स्वरूपात देण्यात यावा, बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना महापालिकेत नोकरीसाठी राखीव जागा उपलब्ध करून द्यावी, बाधितांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्यावे ,भविष्यात या रस्त्यावर टोल आकारणी झाल्यास बधितांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी टोल माफी मिळावी या मागण्या करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांचा विचार करून शेतकऱ्यांना (farmers) न्याय द्यावा अन्यथा शेतकरी रिंग रोडला जागा देण्यास तयार होणार नाहीत असा इशारा गोरखनाथ म्हात्रे (बाधित शेतकरी) यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com