Eknath shinde And Devendra fadnavis
Eknath shinde And Devendra fadnavisSaam TV

Govt Employees : 'या' वर्षानंतरच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ, जुन्या पेन्शनबाबत काय?

राज्यात सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान दिले जाते.
Published on

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी 14 मार्चपासून संपावर आहेत. या संपाचा अनेक विभागांना फटका बसत आहे, तर सर्वसामन्य जनतेलाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. आता संपकरी कर्मचाऱ्यांना चुचकारण्यासाठी राज्य सरकारने 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest News Update)

राज्यात सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यूनंतर सानुग्रह अनुदान किंवा पेन्शन यापैकी ज्याची निवड केली जाईल ते दिले जाते. 2018 सालापासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ही सवलत लागू आहे.

Eknath shinde And Devendra fadnavis
Farmer March News : CM एकनाथ शिंदेंच्या निवेदनानंतरही शेतकऱ्यांचं 'लाल वादळ' मुंबईत धडकणारच; जे.पी.गावीत म्हणाले..

तिच सवलत राज्यात लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. कर्मचाऱ्याना सेवेत रुजू होताना मृत्यूनंतर कुटुंबियांना पेन्शन हवी की सानुग्रह अनुदान हवे याची निवड करावी लागणार आहे. त्याप्रमाणे मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लाभ मिळणार आहे. यापूर्वी मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानच दिले जात होते.

Eknath shinde And Devendra fadnavis
Rain Today: अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं झालं; अंगावर वीज कोसळून मुलगा, महिलेसह चौघांचा मृत्यू

मात्र कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना हे कुटुंब निवृत्ती वेतन मिळत नव्हते. याआधी 10 लाखांचा सानुग्रह अनुदान मिळत होतं, यात आता बदल करण्यात आला आहे. नवीन पेन्शन धारकांना या योजनांचा लाभ देण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com