Farmer March News : CM एकनाथ शिंदेंच्या निवेदनानंतरही शेतकऱ्यांचं 'लाल वादळ' मुंबईत धडकणारच; जे.पी.गावीत म्हणाले..

शेतकऱ्यांचं 'लाल वादळ' मुंबईत धडकणारच
Farmer March News
Farmer March NewsSaam tv
Published On

रुपाली बडवे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३५० रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या विधानभवनातील निवेदनानंतरही शेतकऱ्यांच्या लाँगमार्च आंदोलनाचे नेतृत्व करणारे जे.पी. गावीत यांनी आंदोनलावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं 'लाल वादळ' मुंबईत धडकणार आहे. (Latest Marathi News)

मुख्यंमंत्र्यांच्या निवेदनानंतर शेतकरी नेते जे.पी.गावीत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जे.पी.गावीत म्हणाले, 'काल झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने आज उत्तर दिलं. शेतकऱ्यांची (Farmers) अपेक्षा पूर्ण झालेली नाही. अंगणवाडीला पैसे वाढवले'

'वन जमिनीचे पट्टे यासाठी समिती गठन केली आहे. कसणाऱ्यांचे दावे पुन्हा तपासून जमीन ताब्यात दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. पण, त्याची अंमलबजावणी होत नाही तोवर आम्ही वाट पाहणार आहोत, असे जे. पी. गावीत पुढे म्हणाले.

'तो रिपोर्ट आल्यानंतर आम्ही निघू.तोपर्यंत मुक्काम करू. आमच्या हातात कॅापी मिळाली नाही, उद्या मिळेल. त्यानंतर चर्चा करून निर्णय होईल, असेही गावीत म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे निवेदनात काय म्हणाले?

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते त्यात आता वाढ करून ३०० रुपयां ऐवजी ३५० रुपये सानुग्रह अनुदान अशा विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com