Rain Today: अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं झालं; अंगावर वीज कोसळून मुलगा, महिलेसह चौघांचा मृत्यू

Rain Today: गंगाखेड, सोनपेठ तालुक्यात या चारही घटना घडल्या आहे.
Parbhani News
Parbhani NewsSaam TV

Parbhani News : परभणीत अवकाळी पावसाने चौघांचा बळी घेतला आहे. शेतात काम करत असताना वीज अंगावर कोसळून दोन पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. गंगाखेड, सोनपेठ तालुक्यात या चारही घटना घडल्या आहे. (Rain News)

शेतात ज्वारी काढत नीता सावंत या महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. सोनपेठ तालुक्यातील उखळी येथील ही घटना आहे. नीता सावंत व शीला सावंत या दोघी आपल्या शेतातील ज्वारीची काढणी करत असताना दोघी वीज पडल्याने गंभीर जखमी झाल्या.

दोघींना परळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. नीता सावंत याना डॉक्टरांनी तपासून मृत्य घोषित केले तर जखमी शीला सावंत यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Latest News)

Parbhani News
Pune News: प्रेमाचा भयंकर शेवट; मुलीच्या संशयास्पद मृ्त्यूनंतर काही तासांतच प्रियकरानं मृत्युला कवटाळलं

गंगाखेड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने दोघांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर झाले आहेत. बाळासाहेब फड आणि परशुराम नागरगोजे दोन मयतांची नावे आहेत. शेतात शेती काम करत असताना ही घटना घडली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Parbhani News
ऑंsss काय सांंगता! नवरदेव स्वतःच्या लग्नाला जायलाच विसरला; दुसऱ्या दिवशी नवरीकडे गेला, तिथं जे झालं...

सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे वीज पडल्याने एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शेळगाव येथील गिरजप्पा दुधाजी मुलगीर यांच्या शेतात काम करत असताना ओंकार शिंदे या मुलावर अचानक वीज कोसळली. त्याला उपचारासाठी सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com