Anil Bhosale : माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर, ४-५ वर्षांपासून होते कारागृहात; केला होता कोट्यावधींचा घोटाळा

Ex MLA Anil Bhosale : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी माजी आमदार अनिल भोसले यांच्यावर कारवाई झाली होती. मागील काही वर्षांपासून ते तुरुंगात शिक्षा भोगत होते.
Bombay high court granted anil bhosale bail
Bombay high court granted anil bhosale bailSaam Tv
Published On

नितीन पाटणकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Anil Bhosale : माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर झाला आहे. पुण्यातील शिवाजी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल भोसले यांच्या जामीन याचिकेला मंजूरी दिली आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून भोसले कारागृहात होते अशी माहिती समोर आली आहे.

अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. ते महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले होते. २०१० ते २०१६ या काळात ते राज्याच्या राजकारणात सक्रीय होते. ते शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक होते. या बँकेत बनावट कर्ज प्रकरणाद्वारे पैशांचा गैरवापर करण्याचा आरोप भोसले यांच्यावर करण्यात आला होता.

Bombay high court granted anil bhosale bail
Uday Samant: उपमुख्यमंत्रिपदासाठी विजय वडेट्टीवारांनी एकनाथ शिंदेंकडे स्वत:चा प्रस्ताव ठेवला होता; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

भोसले यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह कर्जदार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. त्यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये तब्बल ७२ कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी या दोन्ही विभागांनी भोसले यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते. या दोन्ही गुन्ह्यांत त्यांना जामीन मिळाला आहे.

२०१७ मध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी अनिल भोसले यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका बनू इच्छित होत्या. पण उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचा पाठिंबा घेत त्या नगरसेविका बनल्या. यानंतर भोसले कुटुंब आणि पवार यांच्यात वितुष्ट आले होते. पुढे २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अनिल भोसले यांना घोटाळ्याच्या अंतर्गत अटक झाली होती.

Bombay high court granted anil bhosale bail
President Murmu Republic Day Eve Speech: न्याय,स्वातंत्र्य,समता आणि बंधुता आपलं वारशाचे भाग: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com