Ambernath News : गोडाऊनमध्ये केली चोरी, लाखोंचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स विकले; कर्मचाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ambernath Crime News : चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ६ हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. उर्वरित साहित्याचा शोध पोलीस घेत आहेत.
Employee steals electronic gadgets in Ambernath
Employee steals electronic gadgets in AmbernathSaam Tv
Published On

अजय दुधाणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मौजमजा करण्यासाठी एका कर्मचाऱ्याने लाखो रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची चोरी केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी तब्बल १ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरीप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ कानसई सेक्शनच्या एमपी गेटजवळ भारत पूरणलाल आचरा यांचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून मागील काही महिन्यांपासून महागड्या वस्तू गायब होत असल्याचे आचरा यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली.

Employee steals electronic gadgets in Ambernath
Palghar News: सलग तिसरा षटकार मारताना २७ वर्षीय तरुणाला हार्ट अटॅक, क्रिकेटच्या मैदानावर आयुष्याचा डाव मोडला

या चोरी प्रकरणात पोलिसांनी गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या २३ वर्षीय रोहित दयाराम गुरव या तरुणाला अटक केली. रोहित गेल्या चार वर्षांपासून तेथे काम करत होता. काम करताना मागच्या काही महिन्यापासून आरोपी गोडाऊनमधील महागडे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी आरोपीकडून ५० हजारांचा अ‍ॅपल कंपनीचा मॅकबुक, मेमरी कार्ड, डोम कॅमेरा, पॉवर बँक, वायफाय कॅमेरा, हार्डडिस्क, मोबाईल चार्जर, लॅपटॉप कुलिंग पॅड, यूएसबी चार्जर, ब्लुटूथ, इयर बडस, हेडफोन, पेन ड्राइव्ह असे सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे सामान चोरुन परस्पर विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित साहित्याचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत.

Employee steals electronic gadgets in Ambernath
Shivsena UBT Protest : ST भाडेवाढ, अख्ख्या महाराष्ट्रात 'चक्काजाम'; ठाकरे गट आक्रमक, पाहा VIDEO

रोहितने चोरी केलेला १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. उर्वरित मुद्देमालाचा शोध पोलीस घेत आहेत. चोरीमध्ये आरोपीला कोणी मदत केली का? आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत का? गुन्ह्यात त्याचे साथीदार आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Employee steals electronic gadgets in Ambernath
Pune Crime: गाडी नीट चालवा म्हटल्याने तरुणांची सटकली, मारहाण करत व्यावसायिकावर धारधार शस्त्राने वार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com