Water Shortage: चिंता वाढली! पुण्यातील ११ धरणे कोरडी पडली; धाराशिव जिल्ह्यातही कमी पाणीसाठा शिल्लक

Eleven Dams Dry In Pune: उष्णतेमुळे पुणे जिल्ह्यातील अकरा धरण कोरडी पडली. धाराशिव जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात ७५ टक्क्यांहुन कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
Water Shortage
Water ShortageYandex

सागर आव्हाड साम टीव्ही, पुणे

उष्णतेमुळे पुणे जिल्ह्यातील अकरा धरण कोरडी पडली. पुणे (Pune News) जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत उन्हामुळे आटू लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक तलाव, धरणे कोरडे पडल्याचं दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक बंधारे, तलाव कोरडे पडले आहेत. याशिवाय अकरा धरणे कोरडी आहेत, त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांवर वणवण फिरण्याची वेळ आल्याचं दिसत आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातील जवळपास अर्धी धरणे कोरडी पडली आहेत. सध्या धरणांमध्ये फक्त २० टक्के (Eleven Dams Dry In Pune) म्हणजेच ४१.१६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आता पुण्यात पुढील दीड ते दोन महिने पाण्याची भीषण टंचाई भासण्याची चिन्हे दिसत आहे.

पुणे जिल्ह्यात लहान मोठी एकूण २६ धरणे आहेत. या धरणांतील पाण्याचा पुरवठा शेती तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना होतो. मार्च महिन्यापासून धरणातील पाण्याची मागणी वाढली होती. तीव्र उन्हामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने (Water Shortage) कमी झाली आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात या धरणांमध्ये एकूण ६६.५९ टीएमसी म्हणजे ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठ्यामध्ये १३ टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यातील टेमघर, कासारसाई, वडीवळे, शेटफळ, नाझरे, चिल्हेवाडी, (Water Crisis) माणिकडोह, येडगाव, विसापूर, उजनी, वडज ही धरणे कोरडी पडली आहेत. यामध्ये मृत पाणीसाठा उपलब्ध आहे. तर नाझरे धरणातील मृतसाठाही संपुष्टात आला आहे.

Water Shortage
Pune Water Shortage: चिंताजनक! पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; 391 खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

धाराशिव जिल्ह्यात पाणीसंकट

धाराशिव जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात ७५ टक्क्यांहुन कमी पाणीसाठा (Water Storage) शिल्लक आहे. ५९ प्रकल्प कोरडे पडले आहेत. केवळ ४२.५६१६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्ल्क आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठी पाणीटंचाई जाणवत आहे. नागरीकांनी पाण्याचा जपुन वापर करावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

धाराशिव जिल्ह्यात तापमानात वाढ होऊ लागली तशी पाण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन देखील वाढले आहे. जिल्ह्यातील २२६ प्रकल्पापैकी ५९ प्रकल्प कोरडे (Dharashiv District Have Less Water Storage) पडले आहेत. उर्वरित प्रकल्पातही केवळ ४२.५६१६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत एकाही प्रकल्पात ७५ टक्क्यापेक्षा अधिक पाणी नाही. येत्या काळात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई झळा सहन कराव्या लागणार आहेत. त्यामुळे नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Water Shortage
Maharashtra Water Shortage: टेन्शन वाढलं! राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट, फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com