Pune Water Shortage: चिंताजनक! पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; 391 खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

Pune Division Water Crisis: पुणे विभागात 381 गावांत 391 खाजगी टँकर सुरू असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Pune Water Shortage
Pune Water ShortageSaam Tv

सागर आव्हाड साम टीव्ही, पुणे

Pune Water Shortage News Update

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम सुरू असल्याचं पहिला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी खाजगी टँकर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे विभागात 381 गावांत 391 खाजगी टँकर सुरू असल्याचं समोर आलं (Pune Division Water Crisis) आहे.  (Latest Marathi News)

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात एकूण 423 टँकर सुरू आहेत. यात 391 खाजगी टँकरने अनेक गावांमध्ये मपाणीपुरवठा केला जात आहे. पुणे जिल्ह्यात 107 खाजगी टँकर सुरू (Pune Water Shortage) आहेत. तर सातारा जिल्ह्यात 149 खाजगी टँकर सुरू आहे. सांगलीमध्ये 76 तर सोलापूरमध्ये 59 आणि कोल्हापूरमध्ये 0 असे एकूण 391 खाजगी टँकर सुरू असल्याचं समोर आलं आहे. यात सर्वाधिक खाजगी टँकर हे सातारा जिल्ह्यात सुरू आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याचं विषय हा खूपच गंभीर झाला आहे. अनेक गावांमध्ये पाणी नसल्याने खाजगी टँकरने पाणी दिल जात आहे. पुणे जिल्ह्यात देखील अनेक गावांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली (Pune Water Shortage) आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, पुरंदर आणि शिरूर या ठिकाणी पाण्याचं प्रश्न हा खूपच गंभीर झाला (Water Shortage) आहे. आंबेगाव तालुक्यात 10 टँकर सुरू आहेत. तर बारामती तालुक्यात 21 टँकर आणि पुरंदरमध्ये 51 टँकर आणि शिरूर तालुक्यात 11 टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक टँकर हे पुरंदर तालुक्यात सुरू असल्याचं पाहायला मिळत (Water Issue) आहे.

Pune Water Shortage
Sambhajinagar Water Scarcity : टंचाईने वाढली पाण्याच्या टँकरची मागणी; भाव झाले दुप्पट, टँकरसाठी करावी लागतेय वेटिंग

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष हे लोकसभा निवडणुकीसाठी आपापल्या पक्षाचा प्रचार करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, (Water Crisis) असं असताना अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा गंभीर झाला आहे. शासकीय टँकरसहित खाजगी टँकरने देखील पाणी पुरवठा केला जात आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त यांनी दिली आहे.

Pune Water Shortage
Water Shortage: छत्रपती संभाजीनगरवर पाणी कपातीचं संकट; हर्सूल तलावात फक्त महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com