रुपाली बडवे
Adani Electricity : महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक बसला आहे. आधिच महागाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशात शुक्रवारी रात्री उशिरा अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि बेस्टच्या वीज दरवाढीला मंजूरी देण्यात आली आहे. आज १ एप्रिलपासून हे नवे दर लागू होत आहेत. वाढलेल्या दरांमुळे सामान्य नागरिकांचं महिन्याचं बजेट पुन्हा कोलमडण्याची शक्यता आहे. (Electricity Bill)
२०२५ पर्यंत दरवाढ निश्चित
मुंबईमध्ये अदानी समुहाची वीज पुरवली जाते. अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि बेस्टने एमईआरसीकडे याचिका दाखल केली होती. यामध्ये २०२३-२४ आणि २०२४-२५ पर्यंत वीज दरवाढ निश्चित करण्यात यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर जनसुनावणी घेतल्यानंतर आजपासून वीजदरात मोठी वाढ झाली आहे.
किंमतींमध्ये किती वाढ झाली
वीजदर वाढल्यामुळे आता प्रतियुनिटमागे ४० ते ७५ पैसे जास्तीचे भरावे लागणार आहेत. उदहरणाद्वारे समजून घेऊ, जर टाटा पॉवरचा ०-१०० युनिट इतका वापर झाला तर त्यासाठी १.७० रुपये द्यावे लागत होते. या दरांमध्ये आता वाढ झाली असून ०-१०० युनिटसाठी ३.०५ रुपये आकारले जाणार आहेत. प्रतीयुनिटमागे तब्बल दीड रुपयांनी वाढ झाली आहे.
वीज वहन आकाराचे दरही वाढले
वीज वहन आकाराचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. प्रतियुनिट वहन आकार १.४७ रुपये इतका होता, आता हा दर २.२१ रुपये इतका झाला आहे. टाटाच्या प्रतियुनिट वहन आकार दरातही वाढ झाली आहे. १.४७ इतका दर आधी होता. आता हा दर १.६८ रुपये इतका झाला आहे. ३० पैशांची वाढ झाल्याचे दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.