Eknath Shinde-Yogi Adityanath: अयोध्येत लवकरच 'महाराष्ट्र भवन'; CM शिंदेंना योगी आदित्यनाथ यांचा शब्द

अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यायला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवली आहे.
Eknath Shinde-Yogi Adityanath In Mumbai
Eknath Shinde-Yogi Adityanath In Mumbai SAAM TV
Published On: 

Eknath Shinde-Yogi Adityanath In Mumbai : अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यायला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)  यांची काल, बुधवारी भेट घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही उपस्थित होते.

Eknath Shinde-Yogi Adityanath In Mumbai
Sanjay Raut News: 'हे राजकीय धंदे बंद करा...', योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो, संजय राऊतांनी केली जोरदार टीका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राजभवन येथे स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येमध्ये 'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली. या मागणीला योगींनी तत्वतः मंजुरी दिली.

Eknath Shinde-Yogi Adityanath In Mumbai
Maharashtra Politics : भाजपचं मिशन 45, मग शिंदे गटाचं काय?

तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना आपण लवकरच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर येणार असल्याचेही सांगितले. त्यावर योगी यांनी समाधान व्यक्त करत उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने आमंत्रित करून अयोध्येला आवर्जून भेट द्यावी, असेही मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री राम नाईक तसेच खासदार रवी किशन हेदेखील उपस्थित होते.

योगींचा मुंबईत रोड शो, राऊतांची टीका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ते आज ( ५ जानेवारी) मुंबईत रोड शो करतील. या रोड शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. योगी आदित्यनाथ या रोड शोच्या माध्यमातून अनेक उद्योजकांची तसेच सिने कलाकारांची भेट घेणार आहेत.

यावरून आता संजय राऊत यांनी टीका केली आहे. योगी मुंबईत कशाला रोड शो करत आहेत? आमच्याकडचे उद्योगधंदे ओरबाडून नेणार असेल तर आक्षेप आहेच. गुंतवणुकीसाठी रोड शो कशासाठी? असा सवाल राऊत यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com