MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रतेवर आज होणार सुनावणी; विधानसभा अध्यक्ष मोठा निर्णय घेणार?

Shivsena MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. अपात्रतेसंबंधी एकूण ४० याचिका विधानसभा अध्यक्षांच्या समोर आहेत.
MLA Disqualification Case
MLA Disqualification CaseSaam TV
Published On

MLA Disqualification Case Hearing

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आज महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. अपात्रतेसंबंधी एकूण ४० याचिका विधानसभा अध्यक्षांच्या समोर आहेत. या सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्या, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

MLA Disqualification Case
Pimpri Chinchwad: ड्रीम ११ वर टीम बनवून दीड कोटी जिंकले, पण... पिंपरी चिंचवडचे PSI अडचणीत का आले?

दरम्यान, शिवसेना आमदार (Shivsena News) अपात्रतेची सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार होती. मात्र, ही सुनावणी एक दिवस आधी घेण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला. जी 20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

त्यामुळे आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी एक दिवस आधी घेणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे. १३ ऑक्टोबर रोजी मला दिल्लीतील एका कार्यक्रमाचं आमंत्रण आलं आहे. मी या कार्यक्रमात उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे मी १३ तारखेची सुनावणी १२ तारखेला घेत आहे, असं राहुल नार्वेकर यांनी बुधवारी सांगितलं.

आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीत मला कोणतीही दिरंगाई करायची नाहीये. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी एक दिवस आधी सुनावणी घेणार आहे, असंही राहुल नार्वेकर म्हणाले. दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात नबाम रेबिया केस लँडमार्क जजमेंट असून माझा निर्णय महाराष्ट्राला न्याय देणारा असेल, अशी प्रतिक्रिया देखील राहुल नार्वेकरांनी दिली.

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी वेळापत्रक

  • १२ तारखेला सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही? यावर सुनावणी पार पडेल.

  • १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करेल.

  • २० ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाईल.

  • २७ ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं ( स्टेटमेंट) मांडतील.

  • ६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपापले मुद्देसूद मांडणी करतील व दावे आणि प्रतिदावे करतील.

  • १० नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडेल.

  • २० नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल.

  • २३ नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल.

  • सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडणार आहे.

MLA Disqualification Case
ICC ODI Ranking: आयसीसी वनडे क्रमवारीत केएल राहुलची मोठी झेप; विराटलाही झाला जबरदस्त फायदा, पहिल्या स्थानावर कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com