प्राची कुलकर्णी
मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ नेते, मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या (Shivsena) बहुतांश आमदारांच्या बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. मुंबईतील आमदार मंगेश कुडाळकर यांनी बंडखोरी केल्याने काल शिवसैनिकांनी कार्यालय फोडले. मुंबईत (Mumbai) शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्व गोंधळाची शक्यता पाहता भाजपनेही जोरदार प्रत्युत्तराची तयारी केली आहे. वेळ पडली तर पुढच्या काही दिवसांत रस्त्यावर उतरायची तयारी करा, अशा सूचना भाजप (BJP) कार्यकर्त्यांना बैठकीत देण्यात आल्या आहेत. ( Maharashtra Political Crisis News In Marathi )
राज्यातील राजकीय घडामोडींवर मुंबईत भाजपच्या सर्व आघाड्या आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना महत्वाचा निरोप देण्यात आला आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था विशेषता मुंबईतील परिस्थितीवर भाजपकडून ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार मुंबईत आल्यानंतर मोठा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे भाजपकडून जोरदार प्रत्युत्तराची तयारी केली आहे.
३६ मतदारसंघातून ५० हजार कार्यकर्त्यांची फौज उभा करण्याची भाजपने जोरदार तयारी करण्याचे ठरविले आहे. भाजपने मुंबईतील सर्व जबाबदारी मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, नितेश राणे, अमित साटम यांच्यावर सोपावली आहे. शिवसेनेने घटनांशी भाजपचा संबंध नाही, अशी भूमिका काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली. मात्र, तरीही भाजपने पुढच्या काही दिवसांत रस्त्यावर उतरायची तयारी करा, अशा सूचना भाजप कार्यकर्त्यांना बैठकीत देण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.