Eknath Shinde Latest News: 'आनंद दिघे असते तर ही वेळच आली नसती'

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे.
Eknath Shinde Latest News, Anand Dighe
Eknath Shinde Latest News, Anand DigheSaam Tv
Published On

मुंबई: शिवसेनेच्या (ShivSena) ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान गेल्या पाच दिवसापासून शिवसेनेचे आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. यावरुन आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यभरात शिवसैनिकांनी निदर्शने सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवरुन आता ठाण्यातील केदार दिघे (Kedar Dighe) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. (Eknath Shinde Latest News)

दिघे साहेब असते तर ही वेळच आली नसती. आता दिघे आडनावाचे वलय असेलतर संघटनेसाठी तेच काम करून संघटना जुन्या आणि नव्या शिवसैनिकांमध्ये घरा घरात जाऊन रुजवेन, असंही केदार दिघे म्हणाले. ज्या संघटनेने तुम्हाला सर्वकाही दिले, त्या संघटने विरोधात जाताना विचार करायला हवा होता, असंही दिघे म्हणाले.

Eknath Shinde Latest News, Anand Dighe
Eknath Shinde Live: हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकांना सामोरे जा- आदित्य ठाकरे

ठाण्यातील शिवसैनिक शिवसेनेसोबत (ShivSena) आहेत, आणि इथून पुढेही ठाण्यातील नागरिक शिवसेनेसोबत राहतील असा विश्वासही दिघे (Kedar Dighe) यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde Latest News, Anand Dighe
आता रश्मी ठाकरे मैदानात! बंडखोर आमदारांच्या पत्नींना करणार भावनिक आवाहन

आता रश्मी ठाकरे मैदानात!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भावनिक आवाहन करून सुद्धा शिवसैनिकांनी आपलं बंड सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार सध्या गुवाहाटी येथे तळ ठोकून आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून हे बंड मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पत्नी रश्मी ठाकरे या देखील मैदानात उतरल्या आहेत. (Shivsena Latest News)

रश्मी ठाकरे यांचा आमदार कुटुंबियांशी अनेक दिवसांपासून संपर्क आहे. त्यामुळे त्या आता आमदारांच्या पत्नीना भावनिक आवाहन करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचं बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. उद्धव ठाकरे हे सध्या आमदारांसोबत संपर्क साधत आहेत. दुसरीकडे आमदार कुटुंबीयांशी बोलण्याची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com