Eknath Shinde Live: हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकांना सामोरे जा- आदित्य ठाकरे

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे.
Aditya thackeray
Aditya thackeraysaam Tv

सरकार अल्पमतात आले आहे हे मान्य करावे: दीपक केसरकर

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे, हे त्यांनी मान्य करावे, असं शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले.

शिवसेना आक्रमक! नवी मुंबईत एकनाथ शिंदेच्या विरोधात शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा

नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले.

रश्मी ठाकरे मैदानात! बंडखोर आमदारांच्या पत्नींना करणार भावनिक आवाहन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करून सुद्धा शिवसैनिकांनी आपलं बंड सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार सध्या गुवाहाटी येथे तळ ठोकून आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून हे बंड मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पत्नी रश्मी ठाकरे या देखील मैदानात उतरल्या आहेत.

आम्ही कायम शिंदेसोबत राहणार : शिंदे समर्थक

Summary

उल्हासनगरमधील श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडलं आहे.त्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष पेटला आहे. आता ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.

आम्ही अजुनही शिवसेनेत: दीपक केसरकर

गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही अजुनही शिवसेनेत असल्यचा दावा केला आहे.

शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढलं

राज्यातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं नेतेपद काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पहिला ठराव, कारवाईचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्याचा ठराव

आसाममधील गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे गटाची बैठक सुरू

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह गटाची बैठक गुवाहाटीत सुरू झाली आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे.

मुंबईत जमावबंदीचे १० जुलैपर्यंत आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात

शिवसेना भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचले

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात होणार आहेत. अनेक नेते तेथे पोहोचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीसाठी पोहोचले आहेत. शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले आहेत. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आम्ही कायदेशीर सल्ले घेत आहोत. आम्ही यशस्वी होऊ. महाविकास आघाडी एकत्र काम करेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

शिवसेनेत जे घडते हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मुख्यमंत्री हा विषय सक्षमपणे हताळतील - अशोक चव्हाण

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे नेते शिवसेना भवन परिसरात पोहोचले आहेत. 

शिवसेनेच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी नवी मुंबईत लावले बॅनर

बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

पुण्यात राडा, शिवसेना आमदार तानाजी सावंतांचे कार्यालय फोडले

बंडखोर आमदारांबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आहे. पुण्यात त्याचे पडसाद उमटले. एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या बोर्डाला काळे फासण्यात आले. तसेच शिंदे पिता-पुत्राच्या फोटोंना काळे फासण्यात आले. पुण्यातील सदाशिव पेठेत असलेले कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. तसेच पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली.

आमदारांचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री, गृहविभागाने दिले नाहीत-गृहमंत्री

राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदेंचे खळबळजनक ट्विट

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी नवं ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. राजकीय आकसापोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे, असे ट्विट शिंदे यांनी केले आहे. शिवसेनेच्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे, याकडेही शिंदे यांनी या ट्विटमधून लक्ष वेधले.

शिंदे गट मविआचा पाठिंबा काढणार? राज्यपालांना देणार पत्र

आज शिंदे गटाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याची शक्यता आहे. तसं पत्र राज्यपालांना देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी होणार?

शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. मुंबईतील शिवसेना भवनात आज दुपारी एक वाजता ही बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सद्यस्थितीची माहिती देऊन पुढील सल्ला मागू शकतील. या बैठकीत बंडखोर एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक बोलावण्यात आली आहे. आज होणाऱ्या या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा निर्णय निर्णय घेण्याची शक्यता आहे. पक्षाच्या घटनेतही काही बदल केले जाण्याची शक्यता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com