नाशिक : शिवसेनेचे जेष्ठ नेते, मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बहुतांश आमदारांच्या बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) त्यांच्यासोबत ५० आमदारांचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. एकनाथ शिंदे गटाने आपला मुक्काम गुवाहाटी येथे हलवला आहे. राज्यातील या घडामोडीमुळे महाविकास आघाडीचे (MVA) सरकार कोसळू शकते का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याचदरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींवर महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. ( Maharashtra Political Crisis News In Marathi)
महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज म्हणाले, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मकुंडलीनुसार त्यांची सिंह रास आहे. त्यानुसार २० जुलैपर्यंत ग्रहमान खराब आहेत. ९ पैकी ५ ग्रहांच्या अवकृपेमुळे सर्वारिष्ट मतिभ्रम योग होत असून मुख्यमंत्रीपद सत्ता हातातून जाण्याचे प्रखर योग आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मकुंडलीनुसार त्यांची कुंभ रास आहे. त्यांना शनि व गुरू ची विषेश अखंड कृपा होत आहे. तसेच उच्च पद त्यांना प्राप्त होईल आणि येणारे दोन महिने राष्ट्रासाठी अतिशय चिंताजनक युद्धजन्य परिस्थिती आहे. येत्या काही दिवसात निसर्ग प्रकोप आदि घटनांचे पण अनुभव येतील. राहू व केतूच्या प्रभावमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता पण नाकारता येत नाही'.
ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थानार्थ शिंदे समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी शेकडो शिंदे समर्थक उपस्थित होते. या शिंदे समर्थकांना ठाण्यातील माजी महापौर नरेश म्हस्के यांनी संबोधित केले. यावेळी नरेश म्हस्के म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरे यांनी जो मूलमंत्र दिला आहे, तो झेंडा घेऊन एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात उतरले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण जमलो आहोत. शिंदे साहेबांनी सांगितले की, 'मी शिवसेनेसोबत आहे. बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे. मी वेगळा गट बनवला नाही'. आम्ही शिंदे साहेबांच्या पाठीशी आहोत, हे दाखवण्यासाठी आपण जमलो आहोत. तुम्ही पावसातही जमला आहात. त्याबद्दल आभार मानतो'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.