शिंदेसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन

शिंदे समर्थकांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
MP Shrikant Shinde
MP Shrikant Shindesaam tv
Published On

मुंबई : शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे बॅनर फाडले असून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उल्हासनगरच्या कार्यालयाची तोडफोडही केली. त्यानंतर आता शिंदे समर्थकांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आजही शिवसेनेत आहेत. चाळीस आमदार आणि दहा अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. अनैसर्गिक आघाडीतून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे, असा सल्ला श्रीकांत यांनी शिवसेनेला दिला आहे. यावेळी शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा केली. शिंदेसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा शिंदे समर्थकांनी दिल्या.

MP Shrikant Shinde
शिवसेना आक्रमक! ४२ बंडखोर आमदारांविरोधात ४२ शिवसैनिकांनी केले मुंडन

यावेळी शिंदे समर्थकांना संबोधित करताना श्रीकांत म्हणाले, एकनाथ शिंदे आजही शिवसेनेत आहेत. ४० आमदारा आणि १० अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहे.अनैसर्गिक आघाडीतून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ठाणे जिल्ह्याच्या बाहेरही एकनाथ शिंदें यांना समर्थन मिळत आहेत. या सर्व पन्नास आमदारांना एकसारखाच त्रास झाला आहे. राज्यात चांगेल दिवस येतील अशी अपेक्षा होती. पण कार्यकर्ता खांद्यावर भगवा घेवून फक्त लढतोय, कार्यकर्त्यांची कुठलीच कामं होत नाहीय.

MP Shrikant Shinde
मतं मागायची असतील तर तुमच्या बापाच्या नावाने मागा; उद्धव ठाकरे बंडखोरांवर संतापले

शिंदेच्या नेतृत्वावर ५० आमदारांनी विश्वास ठेवलाय. आमदारांना निधी मिळत नाही.आमच्यावर अन्याय होत असेल तर काय फायदा या सत्तेचा. सामान्य कार्यकर्त्यापर्यंत कामं पोहोचत नाहीत. राष्ट्रवादीचा पालकमंत्री असल्यानं निधी थांबवला गेला. शिवसेना आमदारांचा एकनाथ शिंदेंवर जास्त विश्वास आहे. आम्हाला निधी मिळत नाही हीच आमची तक्रार आहे. शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा केली. शिंदेसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा शिंदे समर्थकांनी दिल्या. यावेळी शिंदें समर्थकांच्या हातात असलेल्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो लावले आहेत.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० समर्थक आमदारांसह बंडाचे निशाण फडकवल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरु आहे. दिवसेंदिवस सत्तासंघर्षांचा वणवा भडकत असून बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com