बीड : शिवसेनेते नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समर्थक आमदारांसह बंडाचा झेंडा फडकवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ घोंघावत आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात मोठा संघर्ष होत असून शिवसैनिक (shivsena) आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाचे बॅनर फाडून बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे पडसाद राज्यात उमटले असून बीडमध्ये ४२ बंडखोर आमदारांविरोधात ४२ शिवसैनिकांनी (Shivsena Protest) चक्क मुंडन करुन निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडचे जिल्हासंघटक रतन गुजर (ratan gujar) यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेंनी आमदार फोडल्यामुळे ४२शिवसैनिकांनी मुंडन करुन त्यांचा निषेध केला आहे. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
याबाबत बीडचे शिवसेना जिल्हा संघटक रतन गुजर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्वाची पदे दिली आहेत. तरीही ते शिवसेनेला त्रास देत आहेत.शेवटी सत्य परेशान हो सकता है पराजित नही. शिवसैनिक नक्कीच परत येतील. जरी नाही आले, तरीही जोमाने उभं राहण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शिवसेनेशी गद्दारी करणार नाही.शिवसेनेचा एक-एक माणूस निवडून आणू आणि पुन्हा उद्धव ठाकरेंचे आणि आदित्य ठाकरेंची मान उंचावू,अशी भावना यावेळी जिल्हा संघटक रतन गुजर यांनी व्यक्त केली.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.