मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभात महापुरुषांचा अपमान; अमोल मिटकरींची टीका

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले.
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest NewsSaam Tv

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. सध्या शिंदे गट आणि भाजप एकत्र येत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यभरातून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. तर अनेक ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करत आहेत.

शिंदे गटातील अनेक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करत आहेत. आमदार मंगेश कुडाळकर यांनीही एकनाथ शिंदेंचा सत्कार समारोह ठेवला होता. मात्र या कर्यक्रमात कार्यकर्त्यांच्या गोंधळात स्टेजवर ठेवेलेले महापुरुषांचे फोटो खाली पडले आणि याचाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावरूनच सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

हा व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही ट्विट केला आहे. मिटकरी यांनी यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “राजकारण करा पण महापुरुषांचा असा अनादर होत असेल तर ते जनता सहन करु शकणार नाही.”, असे ट्वीट आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काही दिवसांनी होणार असल्याचे बोलले जात आहे. तर विरोधकांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन टीका करण्यास सुरूवात केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com