Eknath Shinde helps accident victim : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा अनुभव आला आहे. मुंबईतील विक्रोळीमध्ये दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात चालक एक जण गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी एकनाथ शिंदेंचा ताफा तेथूनच निघाला होता. रस्त्यावर जमलेली गर्दी आणि जखमींची अवस्था पाहून त्यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील ॲम्बुलन्स जखमींसाठी उपलब्ध करून दिली. शिंदेंच्या या कृतीचे कौतुक होत आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
विक्रोळीत गोदरेज सिग्नल जवळ सोमवारी रात्री अपघात झाला होता. अपघातग्रस्त जखमींना एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील ॲम्बुलन्स देत मदत केली. एका कार्यक्रमासाठी चुनाभट्टीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात होते. त्यावेळी विक्रोळीत गोदरेज सिग्नलजवळ त्यांनी गर्दी पाहिली अन् आपला ताफा थांबवला. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील ॲम्बुलन्स जखमीला देऊन त्यांना उपचाराकरिता राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली व प्रथम उपचार करण्याचे आदेश देखील रुग्णालयाला दिले.
अपघातस्थळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. त्यांनी जखमींना तातडीने राजावाडी रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले. तसेच, रुग्णालय प्रशासनाला जखमींवर प्रथमोपचार आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
या अपघातात जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या घटनेने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या तत्परतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीमुळे जखमींना वेळीच मदत मिळाली आणि त्यांचे प्राण वाचले. अशा संकटकाळात नेत्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि त्वरित कारवाई नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.