Eknath Shinde Government : शिंदे सरकार अडचणीत येणार? माहिती अधिकारातून मोठी माहिती उघड

शिंदे सरकारच्या पाठिंब्याची पत्रचं राज्यपालांकडे नाहीत?
Eknath shinde and Devendra Fadnavis
Eknath shinde and Devendra Fadnavis saam tv
Published On: 

Eknath Shinde Government : राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू असतानाच, आता शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी माहिती समोर आली आहे. कारण, सरकारस्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबतच्या ठरावाची कागदपत्रचं राज्यपाल सचिवालयाकडे नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. (Eknath Shinde Government News)

Eknath shinde and Devendra Fadnavis
CM Eknath Shinde : अरे माझ्याकडे टॅलेंट आहे, पण..., विधानसभेत एकनाथ शिंदेंची टोलेबाजी

नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी शिंदे सरकारच्या पाठिंब्याबाबतची माहिती राज्यपाल भवनाकडे मागितली होती. माहिती अधिकारातर्फे त्यांनी ही माहिती मागवली होती. त्यावर राज्यपाल सचिवालयातील सामान्य माहिती अधिकारी विक्रम निकम यांनी सदर माहिती आमच्या कार्यालयात उपलब्धच नसल्याचं उत्तर दिलं आहे.

दोन्ही पक्षांनी एकमेकांना सत्तास्थापन करण्याबाबत पाठिंबा देण्याविषयी कागदपत्रे दिलेली नसतील, तर मग सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी कोणत्या मुद्याच्या आधारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं होतं, असा प्रश्न संतोष जाधव यांनी उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 40 आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच, एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना निमंत्रणही दिलं. (Eknath Shinde Todays News)

Eknath shinde and Devendra Fadnavis
Navneet Rana : आदिवासी गाण्यावर नवनीत राणांनी धरला ठेका; नृत्य करतानाचा VIDEO व्हायरल

त्यानंतर बहुमत चाचणीच्या आधारे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर एक महिन्यानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पडला.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी शिंदे सरकारच्या पाठिंब्याची माहिती राज्यपाल भवनाकडे मागितली होती. पण राज्यपालांच्या सचिवालयाकडे तशी कागदपत्रचं उपलब्ध नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारस्थापनेच्या कागदपत्राची माहितीच उपलब्ध नसल्याने सरकारच्या वैधतेवर सवाल निर्माण झाला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.