ठाणे : उत्तर प्रदेश (uttar pradesh) येथे पार पडलेल्या निवडणुकानंतर सगळी राजकीय गणित बदलताना दिसत आहेत. त्यातच आता आगामी निवडणुका लक्षात घेता एमआयएम (mim) पक्ष कडून महाविकास आघाडीमध्ये (mva) येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी स्मितहास्य देत टोला लगावत कोण एमआयएम कुठून उपटला माहित नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी (uddhav thackeray) आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे शिंदे यांनी नमूद केले (eknath shinde latest marathi news)
ठाण्यातील किसननगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी महाराजांची पालखी देखील पालकमंत्री यांनी खांद्यावर घेतली होती. या भव्य मिरवणुकीसाठी पालकमंत्री मान्यवर म्हणून उपस्थित होते.
एकीकडे उत्तरप्रदेशच्या निवडणुका असतील किंवा आता येऊ घातलेल्या आगामी निवडणुका असतील सध्या राजकीय चित्र बदलताना दिसत आहेत. या आगामी निवडणुकांमध्ये आघाडी करावी असा प्रस्ताव 'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे केली होती. त्यावर कोण एमआयएम कुठून उपटला माहित नाही असा टोला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. ते म्हणाले एमआयएमला ज्या पक्षात जायचं आहे त्या पक्षाचे प्रमुख आणि कार्यकर्ते त्यांना घ्यायला तयार नाहीत. फक्त मला जायचं आहे, मला भेटायचं आहे अस म्हणून कुठल नाटक आहे हे माहित नाही. एमआयएम सोबत शिवसेनेची (shivsena) युती कधीच होऊ शकत नाही. कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उभी केली आहे आणि या देशामध्ये हिंदूंना ताठ मानेने जगता याव यासाठी शिवसेना उभारली आहे. त्यामुळे एमआयएम आणि शिवसेना एकत्र येणे कदापि शक्य नसल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.