Raj Kundra: बिटकॉईन प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; राज कुंद्रासह शिल्पा शेट्टीची कोट्यवधींची मालमत्ता जप्त

ED Seized Raj Kundra Property: राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यांची एकूण ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ED Seized Raj Kundra Propery
ED Seized Raj Kundra ProperySaam Tv

सचिन गाड साम टीव्ही, मुंबई

राज कुंद्राच्या (Raj Kundra) अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यांची एकूण ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने राज कुंद्रा याची कोट्यावधींची मालमत्ता जप्त केला आहे. बीटकॉइन प्रकरणी (Bitcoin Case) ईडीने ही कारवाई केली आहे. मागील काही दिवसांपासून राज कुंद्राच्या अडचणी थांबायचं नाव घेत नसल्याचं दिसत आहे.

ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत राज कुंद्रावर जप्तीची कारवाई (ED Seized Raj Kundra Property) केल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमध्ये ईडीने शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) नावावर असलेला जुहू येथील रहिवाशी फ्लॅट तसंच कुंद्रा याच्या नावावर असलेला पुण्यातील बंगला आणि शेअर्स करण्यात जप्त केले आहेत.

काय आहे प्रकरण

आजची राज कुंद्रावर ही कारवाई ईडीने बिटकॉईन घोटाळा प्रकरणात केली आहे. हा घोटाळा जवळपास दोन हजार कोटी रूपयांचा असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणामध्ये (Raj Kundra News) ईडीने याआधी २०१८ मध्ये समन्स बजावले होते. २०१८ मध्ये या बिटकॉईन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाजला तेव्हा अटक करण्यात आली होती.

हा घोटाळा मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. बिटकॉईनच्या एका संकेतस्थळावरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचं या प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे. हे प्रकरण राज कुंद्राशी (Raj Kundra Bitcoin Case) संबंधित आहे. त्यामुळेच त्याची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

ED Seized Raj Kundra Propery
Raj Kundra - Shilpa Shetty: राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी सिद्धिविनायकाच्या चरणी, 'UT-69' रिलीज होण्यापूर्वी घेतलं बाप्पाचं दर्शन

आयपीएलच्या सट्टेबाजीतही यापूर्वी राज कुंद्राचं नाव सट्टेबाजीतही आलं होतं. आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सचे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे सहमालक होते. या प्रकरणामध्ये राज कुंद्राची चौकशी देखील झाली (Shilpa Shetty Husband) होती. त्यावेळी त्याने फिक्सिंगचा गुन्हा कबुल केलेला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करत राजस्थानवर दोन वर्षाचा बॅन लावला गेला होता.

ED Seized Raj Kundra Propery
Raj Kundra: जेलमध्ये असताना माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता पण..., राज कुंद्राने सांगितला 'तो' कठीण प्रसंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com