Karnala bank Scam: शेकापच्या माजी आमदारावर ईडीची मोठी कारवाई; 152 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर आणली टाच, काय आहे प्रकरण?

Karnala bank Scam: शेतकरी कामगार पक्षाचे माजी नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीने मोठा झटका दिला आहे.
Karnala bank Scam:
Karnala bank Scam: Saam tv
Published On

सचिन गाड

Karnala bank scam:

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीने मोठा झटका दिला आहे. ईडीने बँक घोटाळा प्रकरणी विवेक पाटील यांच्या 152 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तांवर तात्पुरत्या स्वरूपात टाच आणली आहे. या मालमत्तेत भूखंड, बंगला तसेच रहिवाशी संकुलाचा समावेश आहे. (Latest Marathi News)

विवेक पाटील यांनी चार वेळा शेकापचे आमदार म्हणून काम केलंय. विवेक पाटील यांनी तीन महिन्यापूर्वीच राजकारणातून संन्यास घेतला. विवेक पाटील कर्नाळा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. ईडीकडून त्यांच्यावर बँक घोटाळा प्रकरणी कारवाई सुरु आहे.

शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने ५२९ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांच्या ठेवी उचलून बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

तत्पूर्वी, ईडीने आज गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीने मोठा झटका दिलाय. ईडीने बँक घोटाळा प्रकरणी 152 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तांवर तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली.

तसेच ईडीने जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत कर्नाळा महिला रेडिमेड गारमेंट्स कॉर्पोरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या मालमत्तेचाही समावेश आहे. बँक घोटाळा प्रकरणी आतापर्यंत एकूण 386 कोटी रुपये किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे.

Karnala bank Scam:
Chandrapur Crime News | २६ वर्षीय तरूणाची मित्रांकडूनच हत्या, नेमकी घटना काय? पोलीस काय म्हणाले?

काय आहे प्रकरण?

माजी आमदार विवेक पाटील कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. कर्नाळा बँकेतील ५२९ कोटीच्या ठेवी उचलून गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटील यांना जून, २०२१ मध्ये ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com