मनसे नेते राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची आज ईडीकडून चौकशी झाली.
चौकशी लोढा ग्रुपच्या आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीशी संबंधित आहे.
१९९४ पासून पाटील आणि लोढा यांच्यातील जुने व्यवहार तपासले जात आहेत.
या प्रकरणात आणखी काही मोठ्या नावांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जाते.
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची आज अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी केली आहे. ही चौकशी लोढा ग्रुपचे भागीदार राजेंद्र लोढा यांच्याकडून झालेल्या आर्थिक व्यवहार आणि ट्रान्झेक्शन संदर्भात करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लोढा ग्रुपचा विश्वासघात आणि फसवणूक प्रकरणी सध्या ईडी तपास सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या आर्थिक ट्रान्झेक्शनमध्ये विनोद पाटील यांचे नाव समोर आले असल्याने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.
१९९४ पासून पाटील कुटुंबीय आणि लोढा यांच्यात आर्थिक संबंध असल्याचे स्रोतांकडून समजते. त्या काळातील काही जुने व्यवहार आणि निधी हस्तांतरणाचा हेतू काय होता, याबाबत ईडीने सविस्तर विचारपूस केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी विनोद पाटील यांचा जबाब घेतल्यानंतर टीम मुंबईकडे रवाना झाली आहे. या चौकशीमुळे डोंबिवली आणि ठाणे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
लोढा ग्रुपच्या व्यवहारातील आर्थिक अनियमिततेबाबतचा तपास आता ईडीकडे असल्याने पुढील काही दिवसांत आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राजू उर्फ प्रमोद रतन पाटील हे मनसे पक्षाचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले एकमेव आमदार होते. मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला.
कल्याण ग्रामीणचे आमदार म्हणून काम पाहिलेले आणि व्यावसायिक असणाऱ्या राजू पाटील यांचे आर्थिक व्यवहार हे विनोद पाटील संभाळत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच विनोद पाटील हे ईडीच्या रडारवर आले आहेत. या धाडीत अधिकाऱ्यांच्या हाती काय लागते हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.