

Cm Eknath Shinde on MVA Government: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना अनेक लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुद्धीतून बंद करण्यात आले होते. त्या सरकारमध्ये सगळे अहंकाराने भरले होते, सर्वांना प्रचंड इगो होता, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.
मात्र शिवसेना भाजप युतीचे सरकार गेल्यावर्षी सत्तेत आल्यानंतर आम्ही या बंद करण्यात आलेल्या लोकहिताच्या प्रकल्पांना चालना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारडून राज्याच्या विकासकामांना आवश्यक तेवढा निधी मिळतो. राज्याच्या प्रत्येक विकासाच्या प्रस्तावाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला वेग आला आहे, असंही ते म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ''महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास मंदावला होता. आता आम्ही पुन्हा जोमाने काम करुन २०१४ च्या सरकारमधील लोकहिताचे प्रकल्प आम्ही सुरु केले आहेत. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडून निधी मिळत नसल्याची बोंब करत होती, मात्र कोणी निधी आणून देत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळे प्रकल्प थंडावले होते.''
मुख्यमंत्री म्हणाले, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. आजचा प्रवेश ऐतिहासिक आहे, गोऱ्हेंच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. शिवसेना भाजप युती मजबूत आहे व मनापासून झालेली आहे, हे यातून समोर आले आहे.
ते म्हणाले, आमची युती वैचारिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन हे युती सरकार आले आहे. वर्षभरात धडाकेबाज निर्णय घेतले. लोकांच्या मनात स्थान मिळाले आहे. २०१४ ते २०१९ खऱ्या अर्थाने युतीचे सरकार होते. लोकहिताचे निर्णय घेतले गेले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकहिताच्या कामांवर मर्यादा आली, अनेक प्रकल्प राजकीय हेतूने बंद करण्यात आले. मात्र आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर लोकहिताचे, विकासाचे प्रकल्पांना वेग आला. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले, आम्ही विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना दिली. शिवसेना व धनुष्यबाणावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. मात्र काही जण त्यांच्या समाधानासाठी आपल्या सोयीचा अर्थ काढत असल्याचा टोला त्यांनी लगावला. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम, त्यांची भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत. त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. स्वप्नवत वाटणारी कामे मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास जात आहेत. बाळासाहेबांच्या भूमिकेसोबत कधीही तडजोड होणार नाही, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवसेना भाजप युती त्यांच्या विचारांवर झाली आहे. त्यांचे विचार मोदी-शाह पुढे नेत आहेत. राम मंदिर उभारणी वेळी चेष्टा झाली मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वाची सर्व कामे पूर्ण होत आहेत, असे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.