Taj Hotel: खळबळ! मुंबईतील ताज हॉटेलसमोर एकाच नंबरप्लेटच्या २ कार; पोलीस अ‍ॅलर्ट

Fake Number Plate: मुंबईतील ताज हॉटेलसमोर एकाच नंबरप्लेटची दोन वाहनं उभी असल्यानं खळबळ उडालीय. याबाबत मूळ वाहन चालकाने पोलिसांत तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी घटनास्थळ गाठत, दोन्ही वाहनं कुलाबा पोलीस ठाण्यात नेली आहे.
Taj Hotel
Taj HotelSaam Tv News
Published On

मुंबईतील ताज हॉटेलसमोर एकाच नंबरप्लेटची दोन वाहनं उभी असल्यानं खळबळ उडाली आहे. याबाबत मूळ वाहन चालकाने पोलिसांत तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी घटनास्थळ गाठत, दोन्ही वाहनं कुलाबा पोलीस ठाण्यात नेली असून, एफआयआर दाखल करण्यात आलाय. यामधली बनावट नंबर प्लेटची गाडी कोणती? त्याचा यामागे उद्देश काय? या सर्व प्रश्नांची शोधण्यात येत आहे. MH 01 EE 2388 हा क्रमांक दोन गाड्यांवर आढळला असून, नंबर प्लेट पिवळ्या रंगाची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एकच्या सुमारास एकाच नंबर प्लेटची दोन्ही वाहनं मुंबईतील ताज हॉटेलसमोर उभी होती. त्यानंतर मुळ नंबरच्या चालकानं पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची दखल घेत दोन्ही वाहने कुलाबा पोलीस ठाण्यात नेण्यात आली. त्यानंतर ताज हॉटेलसमोर दुसरी गाडी नेमकी कुणाची होती याचा कसून तपास पोलीस करीत आहेत.

Taj Hotel
Taj Hotel : ताज हॉटेलची सुरक्षा भेदली; एकच नंबर प्लेट असलेल्या दोन गाड्या सापडल्याने उडाली खळबळ | Marathi News

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेलला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यामुळे या परिसरात नेहमी पोलिसांचा फौजफाटा तैनात असतो. मुंबई पोलिसांची सुरक्षा तसेच ताज हॉटेसची स्वत:ची सुरक्षा आहे. मात्र, दुपारच्या सुमारास एकाचवेळी एकाच नंबर प्लेट असलेली दोन वाहनं आल्यानं खळबळ उडाली. या दोन्ही गाड्यांवर MH 01 EE 2388 हा क्रमांक असून, दोन्ही चारचाकी गाड्यांचा रंग देखील पांढरा आहे.

Taj Hotel
Taj Hotel Blast Threat: 'ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट..' धमकीच्या कॉलने खळबळ; आरोपी अटकेत

चेक इनच्यावेळी दोन्ही कारचे नंबर प्लेट सारखेच असल्याचं आढळून आलं. दोघांपैकी एका कारची नंबर प्लेट खोटी असल्याचं स्पष्ट आहे. कुलाबा पोलिसांनी दोन्ही कारच्या चालकांची चौकशी सुरू केली असून, अद्याप तरी कोणताही धागादोरा सापडलेला नाही. खोटी नंबर प्लेट नेमकी का वापरली, यामागचा हेतू काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com