Vegetable Price News: उन्हाचा तडाखा अन् अवकाळी पावसामुळे मुंबईत भाज्यांचे दर कडाडले; लसणाची फोडणीही महागली, पाहा आजचे भाव

Vegetable Price : वाढत चाललेल्या महागाईमुळे आता भाज्यांनाही महागाईची फोडणी बसली आहे. वाढत्या उन्हाळामुळे आणि अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या किमतीत दोन-तीन पटीने वाढ झाली आहे.
Vegetable Price News
Vegetable Price NewsSaam Tv

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पार वाढला आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहेत. हवामान बदलाचा मोठा फटका भाजीपाला पिकांना बसला आहे. भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये आज भाज्यांच्या किंमतीत तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे टेंशन वाढलेले आहे.

Vegetable Price News
Mumbai Water Supply : मुंबईतील 'या' भागातील पाणीपुरवठा तब्बल १६ तासांसाठी राहणार बंद; नागरिकांचा होणार खोळंबा

एपीएमसी बाजारपेठेत सध्या ५४० भाजीपाल्यांच्या गाड्यांची आवक होत असली, तरी ग्राहकांची मागणी जास्त असल्याने दर वधारलेच आहेत. अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे उष्ण वातावरणामुळे भाज्या सातत्याने खराब होत असून याचा परिणाम देखील भाजीपाला दरावर झाला आहे.

पुढील काही दिवसात भाज्यांचे दरात आणखीच वाढ होणार, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. दररोजच्या जेवणात लागणाऱ्या भाजी पाल्यांचे आजचे दर आणि १५ दिवसांपूर्वीचे दर नेमके किती होते? जाणून घेऊयात...

आजचे भाजीपाल्यांचे(vegetables) दर

फरसबीचे दर बाजारात ९५ रुपये प्रति किलो आहे. तर घेवडा ४६ प्रति किलोने विकला जात आहे. दुसरीकडे काकडी २६ रुपये प्रति किलो आहे तर शेवगा शेंगही ३० रुपये प्रति किलो आहे. वाटाणा प्रति किलो १०० आहे आणि फ्लोवर २० रुपये प्रति किलो तर ढोबळी मिरची ३५ रुपये प्रति किलोने विकली जास असून भेंडी ४० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

तसेच चवळी ३३ रुपये प्रति किलो तर सुरण ७२ रुपये प्रति किलोने विकले जात आहे. दुसरीकडे पालेभाज्यांचे आजच्या कोथिंबीरच्या एक जोडीची किंमत २० ते ३० रुपये, तर मेथी २० ते २२ , पालक १८ ते २० आणि कांदा पात १५ ते २० तसेच मुळा ४० ते ५० दराने विकला जात आहे.

१५ दिवसांपूर्वीचे भाजीपाल्यांचे दर

१५ दिवसांपूर्वी बाजारात फरसबीचे दर ७० रुपये प्रति किलो इतके होते. तर घेवडा ३८ प्रति किलोने विकला जात होता. काकडी(cucumber) २५ रुपये प्रति किलो, शेवगा शेंगही २५ रुपये प्रति किलो, वाटाणा प्रति किलो ८० रुपयांनी विकला जात होता. प्लॉवर २१ रुपये प्रति किलो तर ढोबळी मिरची ३५ रुपये प्रति किलोने विकली जात होती. तर भेंडीचे दर प्रतिकिलो ३८ रुपये आणि चवळीचे २६ रुपये प्रति किलो इतके होते. १५ दिवसांपूर्वीचे कोथिंबीरच्या एक जोडीची किंमत२० रुपये तर मेथी १५, पालक १२ रुपयांनी विकली जात होती.

लसणाचे दर २०० च्या पार

एकीकडे भाज्यांचे दर गगनाला भिडले असताना लसणाची फोडणी देखील महागली आहे. किरकोळ बाजारात लसणाचे दर हे २०० च्या पार गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. घाऊक बाजारात लसणाचे दर साधारण ५० रुपयांपासून ते जास्तीत जास्त १०० रुपये किलोपर्यंत असतात, मात्र आठ महिन्यांपासून लसणाच्या किंमती वाढलेल्या असून किरकोळ बाजारात लसणाते दर २०० रुपये किलो आहेत. काही दिवसांपूर्वी लसूण तब्बल ४०० रुपयांच्या पार गेला होता.

Vegetable Price News
Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी महत्वाची अपडेट; आज रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com