मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; 15 लाखांहून अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

मुंब्र्यात मोफेड्रीन (MD पावडर) चा व्यापार करणाऱ्या 4 जणांना पकडण्यात मुंब्रा पोलीस आणि NDPS (अंमली पदार्थ विरोधी पथक) च्या पथकाला यश आले आहे.
मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; 15 लाखांहून अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त
मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; 15 लाखांहून अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्तSaam TV
Published On

मुंब्रा : मुंब्र्यात मोफेड्रीन (MD पावडर) चा व्यापार  करणाऱ्या 4 जणांना पकडण्यात मुंब्रा पोलीस आणि NDPS (अंमली पदार्थ विरोधी पथक) च्या पथकाला यश आले आहे. यात अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींमध्ये एका नायजेरियन व्यक्तीचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे या चारही जणांना पोलिसांनी वेगवेगळ्या दिवशी एकाच ठिकाणाहून अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी अंदाजे 15 लाखहुन अधिक किमतीचे मोफेड्रीन ड्रग्स जप्त केले आहे. हे अमली पदार्थ त्यांनी कुठून आणले व त्याची विक्री कुठे करणार होते याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; 15 लाखांहून अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त
सांगली DCC बँकेसाठी 85.31 टक्के मतदान; 23 नोव्हेंबरला मतमोजणी

मुंब्रा बायपास जवळील वाय जंक्शन रोडवर एक इसम अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच 19 नोव्हेंबरला मुंब्रा पोलिसांनी NDPS च्या टीम सोबत सापळा रचत एका नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेतले. या नायजेरियन व्यक्तीची झडती घेतली असता त्याकडून 5 लाख 6 हजार रुपये किमतीचे 100 ग्राम मोफेड्रीन ड्रग्स मिळाले. गोडविन इफेनजी (41) असे या नायजेरियन व्यक्तीचे नाव असून तो नवी मुंबईच्या सेक्टर 3 मध्ये राहतो त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर पोलिसांना 20 नोव्हेंबर रोजी एक जण MD ड्रग्स विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी पुन्हा NDPS च्या टीम सोबत मुंब्रा बायपास वाय जंक्शन जवळ सापळा रचत फिल्मी स्टाईलने 1 किलोमीटर पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले. नदीम खान (40) असे या आरोपीचे नाव असून 10 लाख 320 रुपये किमतीचे 110 ग्राम मोफेड्रीन ड्रग्स जप्त केले. नदीम हा मुंब्रा येथील अमृतनगर परिसरात राहणार असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याआधी 17 नोव्हेंबरला पोलिसांना मुंब्रा बायपास वाय जंक्शन जवळ 2 जण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी 2 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 7 ग्राम वजनाचे 35 हजार रुपये किमतीचे मोफेड्रीन ड्रग जप्त केले होते. मोहम्मद आरिफ मोहम्मद (36) आणि चंचल चिनौरिया (34) असे या दोघांची नावे असून हे दोघेही मुंब्रा हद्दीत राहणारे आहेत. या चारही आरोपींपैकी नदीम हा सराईत गुन्हेगार आहे. तर नायजेरीन आरोपी हा देशात कसा वास्तव्य करतोय? त्याची पार्श्वभूमी काय? त्याचा व्हिजा तपासून त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करून घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच हे चौघे आरोपी हे ड्रग्स कुठून घेऊन आले आणि कोणाला विकणार होते याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com