Mumbai News: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शुक्रवारी (ता. १४) जयंती देशभरात साजरी होणार आहे. या दिवशी विविध भागातून मिरवणुका निघणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमुळे सर्वत्र उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. याचदरम्यान, दुसरीकडे सोशल मीडियावर मरीन लाइन्सवर 'आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला' या गाण्यावर तरुण-तरुणी नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)
मुंबई म्हटलं तर गगनचुंबी इमारतींप्रमाणे येथील चौपाट्या देखील आकर्षणाचा विषय आहे. मुंबईची चौपाटी म्हटल्यावर मरीन लाइन्सला मुंबईकर भेट देतोच. मुंबईकर येथे आल्यावर डोळे भरून समुद्राकडे पाहत असतो.
तर काही मुंबईकर पहाटे व्यायाम आणि प्रभात फेरीसाठी आवर्जुन येथे येत असतात. याच मरीन लाइन्सवर काही कलाकार गिटार वाजवत गाणे देखील गुणगुणत असतात. मुंबईकरांच्या आवडत्या मरीन लाइन्सच्या कट्ट्याजवळ तरुणाई भीमगीतावर थिरकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
'आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला' या गायक आनंद शिंदे यांच्या आवाजातील या गाण्यावर मुंबईतील तरुणाई थिरकत आहेत. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
आकाश साळवी या तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच त्याला लाखोंमध्ये लाइक्स मिळालेत. तसेच अनेकांच्या स्टेटसला हा व्हिडिओ पहायला मिळत आहे.
आकाश स्वतः एक डान्सर आहे. नागरिकांना धावपळीच्या जीवनात थोडा विरंगुळा मिळावा म्हणून तो गेल्या काही दिवसांपासून मरीन लाइन्सवर आपल्या डान्समधून नागरिकांचं मनोरंजन करत आहे.
या आधी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेलं 'राजं आलं राजं आलं...' या गाण्यावर देखील असाच व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाला आहे. बॉलीवूड गाण्यांसहित महापुरुषांच्या गाण्यावरही तरुणाई नाचताना पाहून नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.