डोंबिवलीत स्टंटबाजांचा कहर! बाईकवर उभा राहून तरुणाचा जीवघेणा स्टंट, VIDEO व्हायरल

Youth Riding Bike While Standing Viral Video India: डोंबिवलीतील मोठा गाव-मानकोली परिसरात एका तरुणाने बाईकवर उभा राहून केलेल्या धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
A youth performs a dangerous stunt by standing on a moving bike in Dombivli, raising serious safety concerns.
A youth performs a dangerous stunt by standing on a moving bike in Dombivli, raising serious safety concerns.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवलीत पुन्हा एकदा स्टंटबाजीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाईकवर उभा राहून एक तरुण बाईक चालवतोय हा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाई की मागणी केली जात आहे. मोठा गाव-मानकोली परिसरात तरुणांकडून जीवघेणे स्टंट सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

A youth performs a dangerous stunt by standing on a moving bike in Dombivli, raising serious safety concerns.
Nagpur News : हृदयद्रावक ! हसत्या-खेळत्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनं हळहळ, नेमकं काय घडलं?

डोंबिवलीतील मोठा गाव-मानकोली परिसरात स्टंटबाज तरुणांचा त्रास वाढतच चालला आहे. यापूर्वीही अनेक वेळा येथे स्टंट करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र, तरीही हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता पुन्हा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये एक तरुण थेट बाईकवर उभा राहून बाईक चालवत असल्याचे दिसत आहे.

A youth performs a dangerous stunt by standing on a moving bike in Dombivli, raising serious safety concerns.
Mumbai मध्ये Maratha Reservation संदर्भातील बैठकीस Chandrakant Patil राहणार उपस्थित

हा धोकादायक प्रकार दुसऱ्या व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.या स्टंटबाजीमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून, वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी या स्टंटबाज तरुणांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com