Dombivli Theft News: नणंद- भावजयने सोनारांना रडकुंडीला आणलं; चलाखीने पोलिसांनी दोघीनाही ठोकल्या बेड्या

Crime News: विशेष म्हणजे या दोघी औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. ठाण्यातील खारेगाव परिसरात झोपडी बांधून त्या राहत होत्या.
Dombivli Theft News
Dombivli Theft NewsSaam TV

अभिजित देशमुख, कल्याण

Domabivali Crime News: ज्वेलर्सला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दागिने घेऊन पसार होणाऱ्या भामट्या नणंद आणि भावजयला डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या दोघी औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. ठाण्यातील खारेगाव परिसरात झोपडी बांधून त्या राहत होत्या. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघींवर राज्यभरात तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत. उषाबाई मकाळे, निलाबाई डोकळे अशी या दोन चोरट्या महिलांची नावे आहेत.

Dombivli Theft News
Beed Crime News: धक्कादायक! 30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; बीड शहरात खळबळ

डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरात विनायक ज्वेलर्स दुकान आहे. काही दिवसांपूर्वी या दुकानात दोन अनोळखी महिला आल्या. दुकानाचे मालक आणि कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून या महिलांनी हात चलाखीने दुकानांमधील दागिने चोरले.

काही क्षणात या दोन्ही महिला दुकानातून निघून गेल्या. काही वेळाने ही बाब दुकानदाराच्या लक्षात आली. त्याने आजूबाजूला शोध घेतला मात्र या महिला पसार झाल्या होत्या. दुकान मालकाने याबाबत डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Dombivli Theft News
Nashik Crime News: सिनेस्टाईल पाठलाग! पोलिसांकडून 54 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, लोकांनी टाळ्या वाजवून केलं अभिनंदन

डिसिपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी बलवंत भरडे, सचिन भालेराव यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या महिलांची ओळख पटवली. या दोन्ही महिलांना अटक केली आहे. उषाबाई मकाळे, निलाबाई डोकळे अशी या दोन्ही महिलांची नावं आहेत. या दोघीही नणंद आणि भाऊजय आहेत.

दोघीही मूळच्या औरंगाबादच्या असून खारेगाव परिसरात मैदानालगत झोपडी बांधून तिकडेच राहत होत्या. या दोघी ज्वेलर्सचे दुकाने फिरून त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानातील दागिने घेऊन पसार व्हायच्या. त्यांचं राहणीमान बघून कोणालाही संशय येत नव्हता. डोंबिवलीमधील ज्वेलर्समध्ये चोरी करताना त्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या. त्यानंतर दोन्ही महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या दोन्ही महिलांविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com