Mumbai Local Train :ठाकुर्ली-डोंबिवलीदरम्यान एसी लोकलवर दगडफेक, एक महिला जखमी

Dombivli News: मुंबईतील एसी लोकलवर माथेफिरुन दगडफेक केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे.
AC Local
AC LocalSaam TV
Published On

Central Railway News:

मुंबईतील एसी लोकलवर माथेफिरुन दगडफेक केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. ठाकुर्ली-डोंबिवली स्थानकादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलवर ही दगडफेक केली. अचानक ट्रेनवर आदळलेल्या दगडाने प्रवाशी घाबरले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शरद गांगुर्डेला (वय ३८) अटक केली आहे.

आरोपी शरद गांगुर्डेने मंद्यधुंद अवस्थेत दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. त्याने त्याआधीच्या दोन ट्रेनवर देखील दगडफेक केली होती. परंतु त्यात कोणीही जखमी झाले नसल्ययाचे डोंबिवली आरपीएफ टीमने सांगितले. शरद गांगुर्डे जळगाव जिल्ह्यातील असून मुंबईत नोकरी करतो. गुरुवारी सकाळी ९.२० ला ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान ही घटना घडली.

या दगडफेकीत एसी लोकलच्या एका खिडकीची काच फुटली. त्या खिडकीच्या बाजूला बसलेली महिला किरकोळी जखमी झाली आहे, असं डोंबिवली आरपीएफच्या वरिष्ठ निरीक्षकांनी सांगितले.

शरदने दगडफेक केलेल्या आधीच्या ट्रेनने प्रवास करत असलेल्या प्रवासी अनुप म्हेत्रे यांनी जीआरपीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक निरीक्षक रंजन शिंदे आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहचली. त्यांनी शरदला रुळाजवळ पाहिजे. तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आला. चौकशीदरम्यान, आरोपी दादरच्या एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

AC Local
Mumbai News: वरळी सी लिंक अपघाताप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आरोपी कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

शरद दारुच्या नशेत सकाळी ९ वाजण्याच्या सुमारात डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वेरुळावरुन सीएसएमटीकडे जात होता. लोकलचा हॉर्न वाजल्यानंतर त्याने दगड उचलला आणि ट्रेनवर फेकण्यास सुरूवात केली. आरोपी शरदला रेल्वे कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

AC Local
Lalit Patil Case : ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील किती पैसे मोजायचा? पोलीस तपासात समोर आलेला आकडा ऐकून डोळे पांढरे होतील

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com