Dombivli : डोंबिवलीत रस्ते झाले हिरवे, नागरिक भयभीत; नेमका काय आहे प्रकार?

Dombivli MIDC Chemical News : डोंबिवली MIDC परिसरातील पिंपळेश्वर मंदिर रस्त्यालगतच्या नाल्यातून हिरवट रासायनिक पाणी वाहत असल्याची घटना समोर आली आहे. दुर्गंधी आणि सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
Dombivli : डोंबिवलीत रस्ते झाले हिरवे, नागरिक भयभीत; नेमका काय आहे प्रकार?
Dombivli MIDC Chemical NewsSaam Tv
Published On
Summary
  • डोंबिवली MIDC परिसरातील नाल्यात हिरवे रासायनिक पाणी आढळले

  • पिंपळेश्वर मंदिर रस्त्यावर दुर्गंधी आणि पाणी साचल्याने नागरिक त्रस्त

  • उद्योगांकडून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का ? असा प्रश्न.

  • नागरिकांनी आरोग्य धोक्याबाबत चिंता व्यक्त केली

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

मागील वर्षी म्हणजेच २०२५ साली १४ डिसेंबर रोजी डोंबिवलीतील रस्ते गुलाबी झाले होते. मात्र हे कोणताही गुलाल उधळल्यामुळे नाही तर, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या केमिकलमुळे घडलं होतं. त्यानंतर आता डोंबिवलीच्या नाल्यांमध्ये हिरवं पाणी वाहताना पाहायला मिळत आहे. याचा परिणाम नागरिकांवर आणि त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो .

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील पिंपळेश्वर मंदिर रस्त्यालगत असलेल्या नाल्यातून रासायनिक मिश्रित हिरवट पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Dombivli : डोंबिवलीत रस्ते झाले हिरवे, नागरिक भयभीत; नेमका काय आहे प्रकार?
Amravati Robbery News : फिल्मीस्टाइल दरोडा! सोनाराला खाली पाडलं, अंदाजे दीड कोटींचं 800 ग्रॅम सोनं, लाखोंची कॅश लुटली

स्थानिकांच्या मते, नाल्यातून येणारे पाणी हिरव्या रंगाचे असून त्यातून रासायनिक वास येत आहे. हे पाणी रस्त्यावर साचत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांनी या पाण्यामुळे आरोग्याच्या त्वचेच्या तक्रारी उद्भवण्याची भीती व्यक्त केली आहे.

Dombivli : डोंबिवलीत रस्ते झाले हिरवे, नागरिक भयभीत; नेमका काय आहे प्रकार?
Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक कल्याणमध्ये येऊन लढा; खासदार श्रीकांत शिंदे यांचं गणेश नाईक यांना खुलं आव्हान

या परिसरात अनेक रासायनिक व लघुउद्योग कार्यरत असल्याने सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित उद्योगांकडून प्रक्रिया न करता सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com