Dombivli Fire Update : डोंबिवली MIDC कंपनीतील स्फोट बॉयलरचा नव्हता; ब्लास्ट नेमका कशामुळे झाला? अधिकारी म्हणाले...

Dombivli Fire Update News : अमुदान कंपनीत स्फोट बॉयलरचा नव्हता, तर रिअॅक्टरचा स्फोट होता, अशी महत्वाची माहिती कंपनीच्या बॉयलर विभागाचे संचालक धवन अंतापूरकर यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
डोंबिवली MIDC कंपनीतील स्फोट बॉयलरचा नव्हता; ब्लास्ट नेमका कशामुळे झाला? अधिकारी म्हणाले...
Dombivli MIDC Fire UpdateSaam Tv

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवलीच्या एमआयडीसीमधील कंपनीत स्फोट होऊन आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आता डोंबिवली MIDC कंपनी स्फोट प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. या कंपनीत स्फोट बॉयलरचा नव्हता, तर रिअॅक्टरचा स्फोट होता, अशी माहिती कंपनीच्या बॉयलर विभागाचे संचालक धवन अंतापूरकर यांनी दिली.

कंपनीच्या बॉयलर विभागाचे संचालक धवन अंतापूरकर यांनी डोंबिवलीमधील स्फोटाप्रकरणी महत्वाची माहिती दिली. धवन अंतापूरकर म्हणाले, आमच्या कंपनीत काल देखील संचालक आले होते, त्यांनी खात्री केली की, कंपनीत बॉयलर नाही.

डोंबिवली MIDC कंपनीतील स्फोट बॉयलरचा नव्हता; ब्लास्ट नेमका कशामुळे झाला? अधिकारी म्हणाले...
Heat Wave Maharashtra: अवकाळीनंतर उकाड्यामुळे बळीराजा संकटात; उष्मघातामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू, लाखोंचं नुकसान

'आज सकाळी देखील पाहणी केली. कंपनीत अनधिकृत बॉयलर देखील नाही. या कंपनीत स्फोट हा रिअॅक्टरचा झाला आहे. रिअॅक्टरमध्ये दोन केमिकल मिक्सिंग केलं जातं. त्याचा कंपनीत स्फोट झालाय, अशीही माहिती अंतापूरकरांनी दिली.

डोंबिवली MIDC कंपनीतील स्फोट बॉयलरचा नव्हता; ब्लास्ट नेमका कशामुळे झाला? अधिकारी म्हणाले...
Dombivali MIDC Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त काय म्हणाले?

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त इंदू राणी जाखड म्हणाल्या, अमुदान कंपनीमधील ब्लास्ट रिॲक्टरचा होता. या दुर्घटनेत ६४ जण जखमी आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. यामधील तिघे जण आयसीयूमध्ये आहेत. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे'.

'स्फोट कसा झाला,कशामुळे झाला, याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. केमिकल कंपन्या स्थलांतरित करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

स्फोटानंतर रिअॅक्टरचे तुकड्यासह पत्रे 100 फुटावर उडाले

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अनुदान केमिकल कंपनीत गुरुवारी रिअॅक्टरचा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता अत्यंत भीषण होती. या अमुदान कंपनीतील रिअॅक्टरचे तुकडे शंभर फूट उडून दुसऱ्या कंपनीत पडले. या कंपनीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या स्फोटानंतर एक किलोमीटर पर्यंत या स्फोटाची तीव्रता जाणवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com