Dombivli Crime News
Dombivli Crime NewsSaam TV

Dombivli: टेम्पोचा धक्का कारला लागला अन् कारचालक संतापला; २ युवकांवर वार

पोलिसांनी पंडित म्हात्रे आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
Published on

डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडील सोनरपाडा परिसरात रविवारी रात्री धक्कादायक प्रकार घडला आहे. गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरुन कारचालकाने दोन युवकांना बेदम मारहाण करत धारधार शस्त्रांनी गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पंडित म्हात्रे असं मारहाण करणाऱ्या आरोपी कारचालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील सोनरपाडा परिसरात रविवारी रात्री टेम्पोमधून मंडप डेकोरेटचे सामान घेवून टेम्पो चालक हर्षद रसाळ जात असताना समोरून येणाऱ्या एका गाडीला त्याच्या टेम्पोचा धक्का लागला. याच कारणावरून संतापलेल्या कार चालक पंडित म्हात्रे आणि टेम्पो चालक हर्षद रसाळ यांच्यात वाद झाला.

पाहा व्हिडीओ -

हा वाद बघून हर्षदचा मित्र विशाल मिश्रा मध्यस्थी करण्यास गेला. दोघांच्या वादात तिसरा आल्याचा पंडित म्हात्रेला राग आला आणि त्याने फोन करून तीन लोकांना बोलावून घेतलं. तीन साथीदारांनी दोन जणांना बेदम मारहाण केली आहे. यात हर्षद रसाळ आणि विशाल मिश्रा नावाचे दोन युवक गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Dombivli Crime News
Rajapur : उदय सामंतला जाळून टाकू; माझं चुकलं ! वाचा आंदाेलकचा माफीनामा

हर्षद आणि विशाल यांना बेदम मारहाण केली. इतकेच नव्हेतर धारदार शस्त्राने दोघांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी फिर्यादींच्या ओळखीच्या लोकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पोलिसांनी पंडित म्हात्रे आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले विशाल व हर्षद यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com