डोंबिवली MIDC मधील कॅटेगिरी 'ए' च्या कंपन्यांचं स्थलांतर होणार; उद्योग मंत्री सामंतांची माहिती

uday samant : डोंबिवली दुर्घटना प्रकरणावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. गेल इंडिया कंपनी बाहेर का गेली, रेड झोनमधील कंपन्या अजून का दुसरीकडे हलवण्यात आल्या नाहीत यावरून त्यांनी सरकारला प्रश्न केले होते. दानवे यांच्या टीकेला आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलंय.
डोंबिवली MIDC मधील कॅटेगिरी 'ए' च्या   कंपन्यांचं स्थलांतर होणार; उद्योग मंत्री सामंतांची माहिती
uday samant Saam Tv
Published On

सुरज मसूरकर, साम प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर म्हणजेच ४ जूननंतर रेड झोनमध्ये असलेल्या कॅटेगिरी 'ए' मधील असलेल्या डोंबिवली एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांचा स्थलांतर केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणांची अंमलबजावणी आचारसंहिता झाल्यानंतर केली जाणार, असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.

डोंबिवलीमधील अमुदान कंपनीतील स्फोटाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील राजकारणात आरोप आणि प्रत्यारोपांचा भडका उडालाय. डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनीच्या स्फोटात आतापर्यत ६४ जण जखमी झाले आहेत. तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान या स्फोमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत दिली जाणार आहे. पण या घटनेवरून विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. आज अंबादास दानवे यांनी डोबिंवलीच्या घटनांवर प्रतिक्रिया देताना गेल इंडिया कंपनी का बाहेर गेली.

डोंबिवलीमधील कॅटेगिरी 'ए' मध्ये असलेल्या कंपनींचे शिफ्टिंग का केली नाही असा सवाल करत सरकारवर टीका केली होती. अंबादास दानवे यांच्या या टीकेला उदयोग मंत्री उदय सामंत यांनी दिलेत. अंबादास दानवे यांनी ज्याप्रकारे आरोप केले आहे त्याचा खुलासा सुद्धा आपण करत असल्याचं सामंत म्हणाले.

गेल इंडिया कंपनी महाराष्ट्राबाहेर का गेली ? यासाठी अंबादास दानवे यांच्या सोबत चर्चा करायला मी तयार आहे, विरोधी पक्ष नेत्यांनी गैरसमज पसरू नये. डोंबिवली जो ब्लास्ट झाला त्यानंतर घटनास्थळी आम्ही तिथे जाऊन सगळी माहिती घेतली डोंबिवली एमआयडीसीमध्ये ज्या रेड झोन मध्ये म्हणजेच 'ए' कॅटेगिरीमध्ये केमिकल कंपन्या आहेत त्यांना तात्काळ शिफ्ट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दोन वर्षांपूर्वी हाच निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्रांनी घेतला होता, त्या ठिकाणी त्यांनी भेट सुद्धा दिली होती.

डोंबिवली MIDC मधील कॅटेगिरी 'ए' च्या   कंपन्यांचं स्थलांतर होणार; उद्योग मंत्री सामंतांची माहिती
Dombivli Fire Update : डोंबिवली MIDC कंपनीतील स्फोट बॉयलरचा नव्हता; ब्लास्ट नेमका कशामुळे झाला? अधिकारी म्हणाले...

अंबादास दानवे यांनी यामध्ये राजकारण न करता दोन वर्षांपूर्वी जर तुम्ही निर्णय घेतला होता तर त्या कंपन्या तिथेच का राहिल्या? याचा सुद्धा उत्तर त्यांनी द्यावे , असं सामंत यावेळी म्हणाले. आमचं सरकार आल्यानंतर या कंपन्यांच्या शिफ्टिंगसाठी आम्ही प्रयत्न सुरू केले होते. जागासुद्धा देण्यात आलीय. मात्र आचारसंहिता असल्यामुळे त्या ठिकाणी शिफ्टिंग होऊ शकलं नाहीये. या कंपन्यांसाठीची जागा उपलब्ध करून द्यायची आहे ती जागा उपलब्ध करून दिली आहे .

४ जून नंतर आम्ही तात्काळ मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली आहे, त्याची अंमलबजावणी करून या कंपन्यांची शिफ्टिंग केली जाईल. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये. २०२२ला गेल कंपनीचे पत्र एमआयडीसीकडे आलो होतो त्यावेळी रत्नागिरी मध्ये जागा उपलब्ध नव्हती त्यानंतर जेव्हा जागा रत्नागिरीमध्ये उपलब्ध झाली तेव्हा आम्ही गेल इंडिया कंपनीला त्यांना कळवलं होतं, पण ती कंपनी का आली नाही याची चर्चा अंबादास दानवे यांनी माझ्यासोबत करावी, असं मंत्री सामंत म्हणाले.

डोंबिवली MIDC मधील कॅटेगिरी 'ए' च्या   कंपन्यांचं स्थलांतर होणार; उद्योग मंत्री सामंतांची माहिती
Dombivli Fire Update: डोंबिवली MIDC मधील कंपनीत स्फोट कशामुळे झाला?, मानपाडा पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

ज्याप्रकारे रिफायनरीला रत्नागिरीमध्ये विरोध झाला आणि तशाच प्रकारे आपल्याला सुद्धा विरोध होऊ शकतो असा विचार करून त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यामुळे ते आले नसावे. त्यामुळे गेल कंपनी गेली म्हणून महाराष्ट्रात कंपनी आल्या नाहीत असा गैरसमज पसरू नये, असं सामंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com