Dombivli Fire Update: डोंबिवली MIDC मधील कंपनीत स्फोट कशामुळे झाला?, मानपाडा पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Dombivli News in Marathi: डोंबिवली एमआयडीसी स्फोटाप्रकरणी मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांना पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधून त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Dombivli MIDC Blast Update: डोंबिवली MIDC मधील कंपनीत स्फोट कशामुळे झाला?, मानपाडा पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
Dombivli MIDC Fire News in MarathiSaam TV

अभिजीत देशमुख, डोंबिवली

डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणात (Dombivli MIDC Blast Case) मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात मानपाडा पोलिसांनी महत्वाची अपडेट दिले आहेत. अमुदान कंपनीमध्ये नेमका स्फोट कशामुळे झाला? याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. डोंबिवली एमआयडीसी स्फोटाप्रकरणी मालती प्रदीप मेहता (Malti Pradip Mehata) आणि मलय प्रदीप मेहता (Malay Pradip Mehata) यांना पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधून त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डोंबिवली अमुदान केमिकल्स रिअ‍ॅकटर ब्लास्ट प्रकरणात पोलिसांनी महत्वाची अपडेट दिली आहे. अमुदान केमीकल्स कंपनीत अ‍ॅल्युमिनीयम आयसोप्रॉक्साईड, डायटररी ब्यूटेल पेरॉक्साईड, टरसरी ब्युटेल पेरबेन्झोट, डाय मिथील पायथांलेट, टस्सरी ब्युटेल हायड्रो पॅराऑक्साईड, मिथी इथील केटोन पॅराअंक्साईड, टरसरी ब्युटीन पियोलेट, कमेन हायड्रो पॅरा अॅक्साईड, बेन्झाल पॅरा अ‍ॅक्साईड, टस्सरी ब्युटेल ऑकेट या रासायनिक पदार्थाचे उत्पादन आणि वापर केला जात होता. या सर्व रासायनिक पदार्थावर प्रक्रिया करण्यासाठी असलेल्या रिअ‍ॅक्टरचा मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली.

Dombivli MIDC Blast Update: डोंबिवली MIDC मधील कंपनीत स्फोट कशामुळे झाला?, मानपाडा पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
Dombivli Fire Update: डोंबिवली MIDC मधील कंपनीत स्फोट कशामुळे झाला?, मानपाडा पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

डोंबिवली एमआयडीसी फेस टूमधील अनुदान या कंपनीमध्ये गुरूवारी भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे अमुदान कंपनी जळून खाक झाली. या कंपनीच्या आगीमुळे आसपासच्या चार ते पाच कंपन्यांना देखील स्फोटाचा झळ लागली. या भीषण स्फोटामुळे आसपासच्या परिसरातील इमारती आणि घरांच्या काचा फुटल्या. डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनीच्या स्फोटात आतापर्यत ६४ जण जखमी झाले आहेत. तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Dombivli MIDC Blast Update: डोंबिवली MIDC मधील कंपनीत स्फोट कशामुळे झाला?, मानपाडा पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
Dombivli Blast News Update : डोंबिवली MIDC कंपनीत भीषण स्फोट,कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल!

या कंपनीमध्ये अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या स्फोटानंतर बेपत्ता झालेल्या कामगारांचे नातेवईक कंपनीच्या बाहेर त्यांची वाट पाहत बसले आहेत. दरम्यान, या स्फोमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्यात येईल. तसंच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या घटनेप्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता यांच्यासह इतर संचालक व्यवस्थापक आणि देखरेख अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मालती मेहताला नाशिकमधून अटक करण्यात आली.

Dombivli MIDC Blast Update: डोंबिवली MIDC मधील कंपनीत स्फोट कशामुळे झाला?, मानपाडा पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
Dombivli Blast News : हातातली अंगठी पाहून पत्नीची ओळख पटली, डोंबिवलीमधील दुर्घटनेत काळजाला चिरणारा पतीचा आक्रोश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com