

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी...
Kalyan Crime News: दारुसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या सेक्युरिटी गार्डशी वाद घालत त्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना डोंबिवली कोपर रोड परिसरात घडली आहे. या हल्ल्यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला असून त्याच्या ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हल्लेखोर तरुण हर्षद कुशाळकरला विष्णू नगर पोलीसांनी अटक केली आहे. (Crime News In Marathi)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवली (Dombivli) पश्चिम कोपर रोड परिसरात असलेल्या पटेल आर मार्टमध्ये मुन्नीराम सहानी हे सेक्युरिटी गार्ड आहेत. काल रात्रीच्या सुमारास सहानी कर्तव्यावर असताना पाऊस आला म्हणून दुकानासमोर टेम्पो मध्ये बसले होते. यावेळी आरोपी हर्षद त्या ठिकाणी आला. त्याने सहानी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.
त्यानंतर वॉचमनसाठी असलेली खुर्ची बसण्यास मागितली. मात्र सहानी यांनी खुर्ची देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या हर्षदने शिवीगाळ सहानी यांना शिवीगाळ केली. यावेळी त्याने सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात बाजूला पडलेला दगड घातला त्यानंतर पुन्हा पेव्हर ब्लॉक घातला.
दरम्यान, या हल्ल्यात सहानी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मुंबई (Mumbai) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करत विष्णूनगर पोलिसांणी हल्लेखोर हर्षद कुशाळकरला सिद्धार्थनगर येथून बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.