Pune Eye Flu News: मागील काही दिवसांपासून राज्यभरात डोळ्यांची साथ पसरली आहे. पुणे जिल्ह्यातही या साथीने डोकं वर काढलं असून अनेकांचे डोळे येणे सुरू झाले आहेत. लहान मुलांचे देखील डोळे येत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली आहे.
दिवसागणिक शहरात काळा चष्मा लावून फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यातील अनेक जणांना या साथीने ग्रासलं असून एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल १ हजार ९० रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे पुणेकरांचं टेन्शन वाढलं असून ऐन पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. चिंताजनक बाब म्हणजे या साथीचा प्रसार शहरासह ग्रामीण भागातही झपाट्याने होत आहे.
शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने डोळे आलेल्या व्यक्तींची रोजच्या रोज नोंद ठेवणे सुरू केले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात गुरूवारी दिवसभरात डोळ्याच्या साथीचे तब्बल १ हजार ९० रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील डोळ्याच्या साथीने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या १३ हजार ९९८ इतकी झाली आहे. यातील ९ हजार ९८ रुग्ण ग्रामीण भागातील असल्याची माहिती आहे. दिलासादायक बाब म्हणजे यापैकी एकूण ८ हजार ५१७ रुग्ण आधीच बरे झाले आहेत.
लहान मुलासह मोठ्यांमध्ये देखील डोळे येण्याची साथ पसरत आहे. अनेक विद्यार्थी डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले असल्याने शाळा प्रशासनाकडून अशा विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याचा सल्ला दिला जात आहे. पावसाळ्यामुळे डोळ्यांच्या आजारांसह साथीच्या आजाराने देखील डोके वर काढल्याने दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.
अचानक डोळे लाल होतात.
डोळ्यातून वारंवार पाणी गळणे सुरू होते.
डोळ्यांना सूज तसेच खाज देखील येते.
काही वेळा डोळ्यातून चिकट द्रवपदार्थ बाहेरील बाजूस येतो.
डोळे जड वाटतात आणि डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटते.
डोळे आल्यास सतत स्वच्छ पाण्याने डोळे धुत राहा.
चेहरा साफ करताना इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल वापरू नका.
डोळ्यांना सतत स्पर्श करु नका
घराबाहेर जाताना गॉगलचा वापर करा.
संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा.
डॉक्टाराच्या सल्यानुसारच औषधं डोळ्यात टाकावी.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.