मावळ : मावळ तालुका हा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका म्हणून ओळखला जातो. मावळात अनेक गडकिल्ले देखील पहायला मिळतात. तुंग, लोहगड, तिकोना या सह अनेक किल्ले आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून या किल्ल्यांची डागडुजी केली जात नाही. या किल्ल्यांकडे शासनाने दुर्लक्ष केलेले पहायला मिळते. मात्र, दिवाळीचे औचित्य साधून मावळ मधील शिवराज या संस्थेने लहान मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली आहे.
हे देखील पहा :
ही स्पर्धा केवळ दिवाळी पुरती मर्यादित न राहता लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजावा त्याचप्रमाणे किल्ल्याप्रति प्रेम निर्माण व्हावे हा हेतू शिवराज संस्थेने यापाठी ठेवला आहे. मागील दहा वर्षापासून ही संस्था दिवाळीत हा उपक्रम राबवित असते. यावर्षी या स्पर्धेत 80 पेक्षा अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. गडसंवर्धन हा एकमेव हेतू या स्पर्धेच्या पाठीमागे आहे.
या चिमुकल्यानी शासनाने शिवाजी महाराजांच्या गडाचे संवर्धन करून गड जपावे अशी मागणी केली आहे. येणाऱ्या आमच्या पिढीला गड किल्ले आणि इतिहास देखील पहायला मिळावे अशी अपेक्षा शिवराज या संस्थेकडून करण्यात आली आहे. तसेच या किल्ल्याचं जतन व्ह्यायला पाहिजे असे मत बाल चमुनी व्यक्त केलं आहे. आता या चिमुकल्यांच्या मागणीकडे शासन लक्ष देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.