Maharashtra Politics: मुंब्र्यातील शाखेवरुन हायकोर्टात रंगणार 'सामना'; ठाकरे गटाकडून कायदेशीर लढाईची तयारी!

Shivsena Mumbra Shakha Dispute: शिवसेना ठाकरे गटाकडून कायदेशीर बाजू तपासून न्यायालय दाद मागतली जाणार आहे.
Shivsena Political Crisis
Shivsena Political CrisisSaam Tv
Published On

Mumbra Shivsena Shakha Dispute:

मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेवरुन शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आलेत, ज्यामुळे ठाण्यामध्ये हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. काल शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यात येऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी दोन्ही गटामध्ये जोरदार राडा झाल्याचेही पाहायला मिळाले. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून या शाखेचा वादही कोर्टात जाणार असल्याचं समोर आलयं.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेनेच्या मुंब्र्यामधील (Mumbra Shakha) एका शाखेवरुन सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलेत. दोन्ही गटाकडून या शाखेवर दावा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनीही कालच्या भेटीमध्ये कोणत्याही परिस्थितीत शाखा सोडणार नसल्याचे सांगितले होते. आता या शाखेचा वाद कोर्टात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून कायदेशीर बाजू तपासून न्यायालय दाद मागतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाकडून याबाबत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. या शाखेबाबत सर्व कागदपत्र ही आमच्याकडे असल्याचा दावाही ठाकरेंकडून करण्यात आला होता.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shivsena Political Crisis
Solapur News : 'फोन पेवर'च कराचे पैसे स्वीकारणे पडले महागात; गुंजेगावच्या महिला सरपंचाचे पद गेले

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल ठाण्यामध्ये येऊन मुंब्र्यातील या शाखेला भेट देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या विनंतीनंतर त्यांनी शाखेजवळ जाणे टाळले. यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी तुमची मस्ती येणाऱ्या निवडणुकांमध्ये काढू.. असा थेट इशाराही शिंदे गटाला दिला. (Latest Marathi News)

Shivsena Political Crisis
Bandra - Worli Sea Link: वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरुणाने मारली उडी; आत्महत्येचं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com