मुंबईत राम नवमीच्या मिरवणुकीत दोन गटात वाद

दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. यात स्थानिकांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे.
Dispute between two groups during Ram Navami
Dispute between two groups during Ram NavamiSaam Tv
Published On

मुंबई: मुंबई येथील मानखुर्द येथे पीएमजीपी परिसरात राम नवमी (Ram Navami) निमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत दोन गटात वाद झाला, त्यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. यात स्थानिकांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे.

मानखुर्दच्या पी एम जी पी परिसरात रविवारी राम नवमी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, दोन गटात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. घटनेनंतर पोलीस (Police) तसेच दंगल नियंत्रक पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.

Dispute between two groups during Ram Navami
Shirdi News : राम नवमी उत्सवानिमित्त शिर्डीत साईबाबांची ४० हजार चौरस फुटांची रांगोळी

राम नवमी (Ram Navami) निमित्त बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या दरम्यान म्हाडा वसाहतीत दोन गटात वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात दोन जण जखमी झाले आहेत.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. घटनास्थळी वेळीच पोलीस पोहचले.

काल रात्री मुंबईतील मानखुर्द परिसरात ३० ते ४० अज्ञात मुलांनी गोंधळ घातला आणि १० ते १५ गाड्यांची तोडफोड केली, या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही अज्ञातांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मुंबईतील (Mumbai) मानखुर्द परिसरात रात्री १० वाजण्याच्या सुमारास ३० ते ४० मुले हातात काठ्या आणि तलवारी घेऊन पीएमजीपी कॉलनीत आले आणि तेथे उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये मुलांचा एक जथ्था अचानक दिसत आहे. ही मुलं वाहनांची तोडफोड करत आहेत, अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली होती. लोक इकडे-तिकडे धावू लागले, वाहनांची तोडफोड करून ती मुंल पळून गेली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात शांतता आहे, मानखुर्द पोलीस (Police) अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com