एव्हिएशन सेक्टर रेग्युलेटर डीजीसीएने शुक्रवारी एअर इंडियाला मोठा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियावर 80 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विमान ड्युटीच्या वेळेची मर्यादा आणि फ्लाइट क्रूच्या रेस्ट संबंधीत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एअरलाइनवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. जानेवारीमध्ये डीजीसीएने एअर इंडियाची अचानक तपासणी केल्यानंतर नियमांच्या उल्लंघनाचे हे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी डीजीसीएने 1 मार्च रोजी एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.
डीजीसी दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइनचे उत्तर असमाधानकारक आढळल्याने 80 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. डीजीसीएच्या काही रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की, एअर इंडिया लिमिटेडने काही प्रकरणांमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन फ्लाइट क्रूला एकत्र उड्डाण करण्यास सांगून विमान नियम 1937 च्या नियम 28A च्या उप-नियम (2) चे उल्लंघन केले आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
डीजीसीएने असेही सांगितले की, एअरलाइनने कर्मचाऱ्यांच्या विकली रेस्ट टाइम कमी केला आहे. याव्यतिरिक्त लांब पल्ल्याच्या उड्डाणांच्या आधी आणि नंतर उड्डाण कर्मचाऱ्यांना दिला जाणार रेस्ट टाईमिंगही कमी केल्याचं आढळले आहे. हे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांशी संबंधित एफडीटीएलच्या तरतुदींचे उल्लंघन आहे. (Latest Marathi News)
तपासादरम्यान ड्युटी वेळेपेक्षा जास्त उड्डाण करणे, प्रशिक्षणाच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने मांडणे, ड्युटी ओव्हरलॅप करणे, अशी प्रकरणेही समोर आली.
दरम्यान, याआधी डीजीसीएने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. मुंबई विमानतळावर 80 वर्षीय प्रवाशाला व्हीलचेअर न दिल्याने हा दंड ठोठावण्यात आला होता. व्हीलचेअरअभावी प्रवाशांना धावपट्टीवरून टर्मिनलपर्यंत चालत जावे लागले होते. नंतर पडून वृद्ध प्रवाशाचा मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.