Praniti Shinde: मला ईडीची भीती नाही, मी भाजपच्या विरोधात बोलणारच: प्रणिती शिंदे

Lok Sabha Election 2024: सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील गावोगावी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. या प्रचारदरम्यान त्या भाजपावर जोरदार हल्ला चढवताना दिसून येत आहेत.
Praniti Shinde On BJP
Praniti Shinde On BJPSaam Tv

Praniti Shinde On BJP:

सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील गावोगावी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. या प्रचारदरम्यान त्या भाजपावर जोरदार हल्ला चढवताना दिसून येत आहेत. "माझ्याकडे सोसायटी, बँक आणि कारखाना नसल्यानी ईडीबिडीची भिती नाहीये, त्यामुळे मी भाजप विरोधात बोलणारच, भाजपचे मागील दोन्ही खासदार आकार्यक्षम ठरले त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांना उमेदवार बदलावा लागला आणि आता तर त्यांना कोणी सापडतच नाहीये" असा आक्रमक पवित्रा प्रणितीने घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील होटगीमध्ये त्या बोलत होत्या.

'ही लोकशाही आहे की हुकूमशाही?'

त्या म्हणाल्या की, "यंदाची निवडणूक ही 'करेंगे या मरेंगे' अशी आहे. लोकशाही आणि संविधान संपावण्याचा डाव भाजप मोदी करत आहेत. कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यासोबतच काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवण्यात आली. एक महिन्यापूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. काँग्रेसचे डी.के.शिवकुमार यांना ही अटक करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाला संसदेत बोलू देत नाहीत. त्यांचे माईक बंद करतात. ही लोकशाही आहे की हुकूमशाही? ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Praniti Shinde On BJP
Odisa Lok Sabha Election 2024: ओडिशात भाजपचं 'एकला चलो रे', बीजेडीसोबत युतीची चर्चा फिसकटली; काय आहे कारण?

प्रणिती शिंदे म्हणाल्या, ''पेट्रोल पंपावर गेलं की मोदींचे मोठंमोठे पोस्टर्स दिसतात, व्हाट्सअपवर त्यांचे पोस्टर्स, टीव्ही - रेडिओ लावला की त्यांची जाहिरात. तुम्हाला एवढं खोटं बोलून वेड्यात काढत आहेत.''  (Latest Marathi News)

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, ''निवडणूकीच्या तोंडावर 2 रुपयांनी पेट्रोलचे भाव कमी करून भाजप लोकांना वेड्यात काढतंय. तरी पण आपण जर भाजपला मतदान केलं तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ. सोलापूर लोकसभा मतदारसंघात 5 आमदार आणि 1 खासदार भाजपचा आहे. यांना उघड पाडण्यासाठी आणि वस्तुस्थिती समजावून सांगण्यासाठी आम्ही येत आहोत."

Praniti Shinde On BJP
PM Modi Bhutan Visit: पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान, 'Order of the Druk Gyalpo' ने केलं सन्मानित

प्रणिती म्हणाल्या, "मोठ्या थाटामाटात मोदीजी सोलापुरात आले होते. तुम्ही मोदीजींकडे बघूनच महाराजांना मतदान केलेलात. मग त्यांनी आपल्यासाठी काय केलं? मुखवट्याकडे बघून फसलात तर नुकसान आपल होत आणि काम करणारे लोक मागे राहतात. जी लोक तुम्हाला जातपात - धर्माच्या विळख्यात अडकवून मतदान करण्यास प्रवृत्त करतात ते लोकशाहीच्या विरोधात असतात.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com