Odisa Lok Sabha Election 2024: ओडिशात भाजपचं 'एकला चलो रे', बीजेडीसोबत युतीची चर्चा फिसकटली; काय आहे कारण?

Odisha News: BJP-BJD Alliance Update in Marathi | भारतीय जनता पक्षाने ओडिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे.
PM Modi and Naveen Patnaik
PM Modi and Naveen PatnaikSaam Tv

BJP-BJD Alliance News :

भारतीय जनता पक्षाने ओडिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ''यावेळी भाजप लोकसभेच्या सर्व 21 आणि विधानसभेच्या सर्व 147 जागांवर स्वबळावर लढणार आहे.''

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी भाजप आणि बिजू जनता दल (BJD) यांच्यात युती होऊ शकते, अशी चर्चा होती. याबाबत दोन्ही पक्षांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता भाजप आणि बीजेडीमध्ये एकत्र निवडणुका लढवण्याबाबत एकमत झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Modi and Naveen Patnaik
PM Modi Bhutan Visit: पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान, 'Order of the Druk Gyalpo' ने केलं सन्मानित

याचबाबत ट्वीट करत मनमोहन सामल म्हणाले की, 'गेल्या 10 वर्षांपासून नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली ओडिशाचा बीजेडी पक्ष राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा देत आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. देशभरात जिथे जिथे डबल इंजिनचे सरकार आले आहे, तिथे विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी कामांना गती मिळाली आहे. तसेच राज्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले की, आज मोदी सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना ओडिशात पोहोचत नाहीत. त्यामुळे ओडिशातील गरीब भगिनी आणि बांधवांना त्यांचा लाभ मिळत नाही.

PM Modi and Naveen Patnaik
Satara Lok Sabha: उदयनराजे दिल्लीत, मात्र अमित शाह यांची भेट झालीच नाही; साताऱ्यात भाजप कोणाला देणार उमेदवारी?

ते म्हणाले, 'ओडिशामधील 4.5 कोटी लोकांच्या आशा, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली विकसित भारत आणि विकसित ओडिशा निर्माण करायचे आहे. यासाठी भारतीय जनता पक्ष यावेळी लोकसभेच्या सर्व 21 आणि विधानसभेच्या सर्व 147 जागांवर एकट्याने निवडणूक लढवणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com