...तर आम्ही शरद पवारांचं स्वागत करतो : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील दगडूशेठ मंदिरात न जाता बाहेरून दर्शन घेतल्यानं जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Sharad pawar AND Devendra Fadnavis
Sharad pawar AND Devendra Fadnavis Saam Tv

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी पुण्यातील दगडूशेठ मंदिरात न जाता बाहेरून दर्शन घेतल्यानं जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पवारांनी मंदिराच्या बाहेरून गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो, अशा शब्दात देंवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ( Devendra Fadnavis Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दगडूशेठ मंदिरातील गणपतीचे दर्शन बाहेरून घेतल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. पुण्यात दगडूशेठ ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीसाठी पवार आले होते. त्यावेळी दगडूशेठ मंदिर आणि भिडे वाड्याचीही पाहणी करणार होते. दगडूशेठ ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यावर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणार होते. मात्र, मंदिराच्या आत न जाता त्यांनी बाहेरूनच गणपतीला हात जोडले. 'मी आज नॉनव्हेज खाल्ले असल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही',अशी प्रतिक्रिया पवारांनी त्यावेळी दिली होती. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले,'लोकांमध्ये श्रद्धा वाढायला हवी अंधश्रद्धा नको. त्यामुळे शरद पवार जर दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले असतील, तर आम्ही त्यांचं स्वागत करतो'.

Sharad pawar AND Devendra Fadnavis
...म्हणून भाजपने आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात गोवलं; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. मात्र, संभाजीराजेंना माघार घेण्यासाठी शरद पवार यांना जबाबदार ठरवत त्यांनी फडणवीसांवर टीका केली.'राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेच्या कोट्यात आहे. हे माहीत असताना देखील शरद पवार यांनी संभाजी राजे यांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहिर केली होती.शरद पवार यांनी अशा प्रकारे भूमिका जाहीर करून संभाजीराजे यांची कोंडी केली, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com