...म्हणून भाजपने आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात गोवलं; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

गुजरातमध्ये सापडणार्‍या ड्रग्सवर कोणतीच कारवाई कशी होत नाही?
Nana Patole On BJP
Nana Patole On BJPSaam TV
Published On

पालघर : उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करून निवडणुका जिंकायच्या होत्या म्हणून, आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात गोवण्यात आलं. आज त्याला क्लिन चीट दिली. मात्र, भाजप देशातील तरुणांच्या जीवाशी आणि भवितव्याची खेळत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आज पालघरमधील आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

तसंच गुजरातमधील मुंदरा या बंदरात ५०० कोटींचं ड्रग्स ताब्यात घेण्यात आलं. या बंदरात नेहमीच ड्रग्सची तस्करी होत असल्याचा आरोप करत भाजप सरकार देशाला उडता पंजाब करू पाहते का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. गुजरातमध्ये सापडणार्‍या ड्रग्सवर कोणतीच कारवाई कशी होत नाही? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजप, अदानी आणि गुजरात सरकारचा समाचार घेतला आहे.

हे देखील पाहा -

महाराष्ट्रातील सरकार आपल्या पक्षाच्या हातून गेल्याने महाराष्ट्रातील भाजपचा (BJP) मानसिक बॅलन्स बिघडला आहे. त्यामुळे भाजपवर बोलून वेळ वाया घालवण्यापेक्षा आम्ही विकासावर बोलू तसंच भाजपकडून वारंवार महाराष्ट्राला गालबोट लावण्याचं काम केल जात असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे . तसंच ज्यांची लायकी नाही त्यांच्यावर काय बोलायचं असं सांगत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर देखील पटोले यांनी निशाणा साधला.

दरम्यान, पत्रकारांनी काँग्रेस मित्रपक्षांमुळे बॅकफूटवर गेली का? असा प्रश्न पटोले यांना विचारला असता, यापुढे सगळे बॅकफुटला जातील फक्त काँग्रेसचा पुढे राहील असं सांगत पटोले यांनी आपल्या मित्रपक्षांवर ही निशाना साधला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com